Skin Care In Festive Season : ऑगस्ट महिना सुरू झाला की एकापाठोपाठ एक सण येतात. गणेशोत्सवापासुन दिवाळी पर्यंत या सणांमुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असते. या काळात कामातून वेळ काढुन कुटुंबासोबत वेळ घालवणे, मित्र-मैत्रिणींना भेटणे, नातेवाईकांसोबत सण साजरा करणे या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. या कार्यक्रमांमध्ये आपण सुंदर दिसावे, आपल्या चेहऱ्यावर तेज असावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते. पण त्यासाठी कामातून वेळ काढून पार्लरला जायला वेळ मिळत नाही. अशावेळी काही टिप्स वापरून तुम्ही चेहऱ्यावर तेज आणू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घेऊया.
घरगुती स्क्रब
आठवड्यातून एक वेळा स्क्रब केल्यानंतर चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. तसेच चेहऱ्यावर जमा झालेली धूळ निघून जाण्यास मदत होते. घरच्या घरी फेस स्क्रब बनवण्यासाठी दह्यात बदाम किंवा अक्रोड वाटून घाला. नंतर ते हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. एखादा विशेष कार्यक्रम असेल तर त्याच्या आधीच्या दिवशी तुम्ही हा फेसपॅक ट्राय करू शकता.
Skin Care Tips : टॅनिंगमुळे चेहरा निस्तेज झालाय? तर ‘हे’ घरगुती उपाय वापरुन पाहाच
गुलाब पाणी
रोजच्या कामांमध्ये आपल्याला चेहऱ्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. अशात चेहरा कोरडा होण्याची शक्यता असते. यावर गुलाब पाणी वापरल्यास फायदा होऊ शकतो. गुलाब पाणी वपारल्याने चेहऱ्यावर तेज येते आणि चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो. यासाठी कापसाच्या गोळ्याने चेहऱ्यावर गुलाब पाणी लावू शकता.
पपईचा फेसपॅक
पपई आरोग्यासोबत चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर असते. पपईचा गाभा, दही आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने चेहरा पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर फेशियल केल्याप्रमाणे तेज येईल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)