जर तुम्हीही Gmail चा वापर करत असाल, आणि माइक्रोसॉफ्ट ऑफिसची फाईल जीमेलमध्येच ओपन किंवा एडिट करता येत नाही ही तुमचीही तक्रार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. युजर्सची ही तक्रार आता कंपनीने सोडवली आहे.

आता तुम्ही जीमेलमध्येच माइक्रोसॉफ्ट ऑफिस अटॅचमेंट किंवा फाइल ओपन किंवा एडिट करु शकाल. म्हणजेच डॉक्युमेंटचा ओरिजिनल फाइल फॉर्मेट न बदलता वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट (Word, Excel, PowerPoint) फाइल एडिट करता येणार आहेत.

आणखी वाचा- iPhone मध्ये आला Bug, युजर्सना मिळत नाहीये SMS नोटिफिकेशन

सध्या हे फिचर G Suite सारख्या गुगलच्या विशेष सेवा वापरणाऱ्यांसाठी रोलआउट करण्यात आलं आहे. सर्व युजर्ससाठी अद्याप हे फिचर जारी करण्यात आलेलं नाही, पण लवकरच सर्वांसाठी हे फिचर रोलआउट केलं जाईल असं गुगलने म्हटलं आहे. नवीन अपडेटनंतर ऑफिस फाईलच्या आतमध्ये एक नवीन रिप्लाय हा पर्यायही मिळेल. या नवीन ऑप्शनद्वारे एडिटिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर ई-मेलमधूनच डॉक्युमेंट्स शेअर करता येणार आहेत.