Premium

Vat Purnima Ukhane : “कुंकवाचा साज, सौभ्यागाचे लेणं….” तुमच्या रावासांठी घ्या असे एकापेक्षा एक भन्नाट उखाणे, पहा लिस्ट

आज आपण वटपौर्णिमेनिमित्त असेच काही हटके उखाणे जाणून घेणार आहोत. पहा एकापेक्षा एक भारी उखाण्यांची लिस्ट

Vat Purnima 2023 special ukhane
(फोटो : स्टार प्रवाह)

वटसावित्री ह पती-पत्नीच्या नात्याचा सण मानला असतो. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा व्रत करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वटपौर्णिमेच्या पौराणिक कथेनुसार सावित्रीने वडाच्या झाडाखाली पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तो दिवस ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा दिवस होता म्हणून या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते.
आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावं, यासाठी विवाहित स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाची पुजा करतात. पुजेनंतर स्त्रिया एकमेकांना हळद कुंकू लावून ओटी भरतात. यादरम्यान त्या एकमेकींना उखाणा घ्यायला लावतात. आज आपण वटपौर्णिमेनिमित्त असेच काही हटके उखाणे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : Vat Purnima Photos: स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकांमध्ये आनंदात साजरी होणार वटपौर्णिमा

१. कुंकवाचा साज, असाच हवाय
७ जन्मी ……राव नवरा म्हणून हवाय

२. नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
……….राव आहे माझे सर्वस्व

३. चंदनी पानात मुग्ध कळी हसली
… वटपौर्णिमेच्या दिवशी कबूल करते, रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

हेही वाचा : Vat Purnima 2023: या वर्षी केव्हा आहे वटपौर्णिमा? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्त्व

४. वटपौर्णिमा आहे म्हणून आज नेसली रावांच्या आवडती साडी,
……………..रावांनी आज फिरायला नेण्यासाठी बुक केली चक्क ४ चाकी गाडी.

५. ……..रावांसोबत मी खेळते दररोज रुसवा फुगव्याचा गेम,
आयुष्यभर असंच आमचं प्रेम राहो सेम

६. वटवृक्षाचे पूजा करत पौर्णिमा करूया साजरी,
……..राव आहे बेधडक, मी बाई लाजरी.

हेही वाचा : Vat Purnima 2023: वटपोर्णिमा स्पेशल व्हेज थाळी; पाहा पुरणपोळीसह संपूर्ण स्वयंपाकाची सोपी रेसिपी

७. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळते धागा,
……… रावांसाठी माझ्या मनात आहे एक खास जागा

८. डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
…… रावांना पहिल्यांदा पाहताच मला झाला होता लवेरिया

९. गोड करंजी सपक शेवाई
………राव होते समजूतदार म्हणून घरच्यांनी करून घेतले जावई

१०. काचेच्या ग्लासात असते गुलाबी सरबत
……राव गेले ऑफिसला की मला नाही करमत

११. पाच सुहासिनी स्त्रियांची ओटी मी भरते
……..रावांसाठी मी नेहमी मी सजते.

हेही वाचा : जाणून घ्या : …म्हणून साजरी केली जाते वटपौर्णिमा

१२ .नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
…….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात

१३. नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
मोदी असो की गांधी फरक पडत नाही
…… राव आहे माझं खरं सरकार

१४. साखरेचे पोते सुई ने उसवले,
…………रावांनी मला पावडर लाऊन फसवले

१५. …….. राव आहे माझे बॅकबोन
त्यांना आवडते दिपिका पदूकोन

१६. ………रावांना जॉबवरुन यायला वाजतात तीन
ते आहेत माझे किंग आणि मी आहे त्यांची क्वीन

१७. वन बॉटल टू ग्लास, ………. राव आमचे फर्स्ट क्लास

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 12:25 IST
Next Story
उन्हाळ्यात सकाळी उठल्यावर ‘हे’ रुटीन फॉलो करा; दिवसभर रहाल फ्रेश, त्वचाही उजळेल