Video Onion Cutting Jugaad: कांदा हा अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहेच त्यासह यात कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. जगभरातील कांद्याची मुबलक उपलब्धता पाहिल्यास हा आहाराचा एक मुख्य भाग बनला आहे. मधुमेही, गर्भवती महिला व तुम्हा- आम्हा सगळ्यांनाच कांद्यातून काय फायदे मिळतात. पण कितीही फायद्याचा असला तरी कांदा चिरताना डोकेदुखी वाढते हा त्रास काही केल्या पिच्छा सोडत नाही. कांद्यातील उग्र दर्प चटकन डोळ्यातून पाणी आणू शकतो, आणि जर का तुम्हाला मोठ्या कुटुंबासाठी किंवा अधिक प्रमाणात जेवण बनवताना कांदा लागणार असेल तर तो चिरताना रडून हैराण व्हायला होतं. अशावेळी इंस्टाग्राम व्हायरल होणारी ही हाक तुमचे कष्ट व अश्रू दोन्ही वाचवू शकते.

लेखिका आणि पोषणतज्ज्ञ मेलानी लिओनेलो यांनी अलीकडेच एक भन्नाट जुगाड शेअर केलाआहे , ज्यामुळे अवघ्या ३० सेकंदात तुम्ही कांदा कापून मोकळे होऊ शकता. शिवाय यामध्ये एक अशी युक्ती वापरली आहे की जेणेकरून तुम्हाला कांदा चिरताना डोळ्यातून पाणीही काढावे लागणार नाही.

आता करायचंय काय, तर एरवी आपण कांदा उभा किंवा आडवा धरून त्याचे दोन भाग करतो, बरोबर? आता आपल्याला कांद्याच्या शेंडीचा आणि मुळाकडील भाग काढून कांदा सोलून घ्यायचा आहे,. मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा उलटा ठेवून त्याला उभे चीर द्यायचे आहेत व मग आडवा धरून एकदा सूरी फिरवली तरी सहज कांदा बारीक चिरला जाईल

Video : ३० सेकंदात कांदा बारीक कसा चिरायचा?

हे ही वाचा<< १०० ग्रॅम कांदा शरीराला काय काय देऊ शकतो? कोणी खावा, कोणी टाळावा, नेमकी माहिती इथे वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, व्हिडिओ शेअर होताच काही दिवसातच याला ८ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे ही हॅक खूप वेळ व त्रास वाचवणारी आहे. तुम्हीही हा जुगाड ट्राय करून पाहणार का, आणि पाहिलात तर तो तुमच्या कामी येतोय का हे आमहाला कमेंट करून नक्की कळवा.