यावर्षी २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांत, नेटफ्लिक्स ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनीच्या सब्सक्राइबर संख्या गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी वेगाने वाढली आहे. आता लोकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्स आपल्या व्यासपीठावर व्हिडिओ गेम्सची सुविधादेखील देणार आहे.मंगळवारी आपल्या निर्णयाची घोषणा करताना नेटफ्लिक्स म्हणाले की, सध्याच्या सबस्क्रिप्शन योजनेत व्हिडिओ गेमचे फिचर जोडले जाईल. त्यासाठी सब्सक्राइबरला कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, ही सेवा कधी सुरू होईल आणि नेटफ्लिक्स कोणत्या प्रकारचे खेळ विकसित करीत आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. कोणत्या प्रकारचे गेम्स असतील, हे फिचर कधी येणार आहे याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर्षी कंपनीने 55 लाख ग्राहक जोडले आहेत

नेटफ्लिक्सच्या आताच्या अर्निंग्स रिपोर्टनुसार एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत कंपनीत १.५  दशलक्ष ग्राहकांची भर पडली आहे. हे कंपनीच्या व्यवस्थापनाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे परंतु अलिकडच्या वर्षांच्या वाढीच्या दरापेक्षा बरेच कमी आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात, जानेवारी-जून २०२१ मध्ये कंपनीने ५.५ दशलक्ष ग्राहकांची भर घातली आहे. ही २०१३ पासूनची नेटफ्लिक्सची सर्वात वाईट कामगिरी आहे. २०१३ हा काळ होता जेव्हा नेटफ्लिक्स कंपनी ओरिजिनल प्रोग्राम आणण्याची तयारी करत होती. आता कंपनी व्हिडिओ गेमद्वारे आणखी एक मोठे पाऊल उचलत आहे. कंपनीने व्हिडिओ गेम एक्झिक्युटिव्ह माईक व्हर्डू नियुक्त केले आहे, ज्याचे काम या क्षेत्रात संधी शोधणे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video games can now be played on netflix the company decision to increase subscriptions ttg
First published on: 24-07-2021 at 11:48 IST