एखाद्या सापाने माशाची शिकार केल्याची घटना आपण आजपर्यंत क्वचितच ऐकली असेल. समजा, तुम्ही असा एखादा किस्सा ऐकला जरी असेल, तरी सापाने माशाची शिकार तीही पाण्याबाहेर केली हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र, ही घटना खरीखुरी असून वन्यजीव छायाचित्रकार रथिका रामासॅमी यांनी हा सगळा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. एरवी, अशा आश्चर्यनजक घटना आपण परदेशातच घडल्याचे ऐकतो. मात्र, ही घटना भारतातील केवलदेव राष्ट्रीय अभयाअरण्यातील आहे. किओलाडो अभयाअरण्य राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात आहे. याठिकाणी असणाऱ्या जंगलातील एका पाणथळ जागी रथिका यांनी या सगळ्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात टिपला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2015 रोजी प्रकाशित
पाहा: साप माश्यांची शिकार करतात तेव्हा…
एखाद्या सापाने माशाची शिकार केल्याची घटना आपण आजपर्यंत क्वचितच ऐकली असेल. समजा, तुम्ही असा एखादा किस्सा ऐकला जरी असेल.

First published on: 27-08-2015 at 04:16 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video have you seen snakes catch fish well it is fascinating