How To Clean Oily Tiffin Video: तुम्ही आतापर्यंत अनेकदा सोशल मीडियावर प्लॅस्टिकच्या तेलकट डब्ब्यांवरून मीम्स पाहिले असतील. ५० स्टीलची ताटं घासू पण एक तेलकट प्लॅस्टिकचा डब्बा नको.. आणि हीच भावना घरात भांडी घासण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीची असते. आपण शाळा कॉलेज ते ऑफिसपर्यंत सगळीकडे प्लॅस्टिकचे डब्बे सर्रास वापरतो. वजनाला हलके असल्याने हे जरा सोयीचं पडतं पण अगदी उत्तम ब्रॅंड्सचे डब्बे सुद्धा तेलाच्या डागांनी व वासाने नकोसे वाटतात. भाजीचं तेल काही केल्या डब्यावरून जात नाही. एवढंच नव्हे तर डब्याच्या झाकणाच्या कडांमध्येही तेल अडकून राहतं. काही दिवसांनी या तेलामुळे डब्याला एका प्रकारचा उग्र वास येऊ लागतो. आज आपण याच त्रासावर एक सोप्पं उत्तर पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर डब्याला लागलेले तेलाचे डाग काढण्यासाठी शेअर केलेली एक ट्रिक चांगलीच व्हायरल होत आहे. अगदी सोप्या ट्रिकसाठी आपल्याला काही वेगळा साबण किंवा ब्रशही आणावा लागणार नाही. तुमचा भांडी घासण्याचा वेळ कमी करणाऱ्या या खाली दिलेल्या स्टेप्स तेवढ्या फॉलो करून पाहा.

हे ही वाचा<< Video: मशीनमध्ये शर्टची कॉलर स्वच्छच होत नाही? साबण, पावडर, ब्रश नव्हे तर ‘हा’ एकच उपाय करा

तेलकट डब्बे कसे स्वच्छ करावे?

  • तेलकट डब्ब्यात थोडं पाणी घ्या. साधं थंड पाणीच उत्तम कारण गरम पाणी अगदी कडक असेल तर प्लॅस्टिक वितळण्याचा धोका असतो.
  • यात तुमचा नेहमीचा भांडी घासायचा साबण किंवा लिक्विड थोड्या प्रमाणात घाला
  • यात एक साधा टिश्यू पेपर टाका.
  • डब्याचं झाकण बंद करा आणि डब्बा हातात घेऊन जोरात हलवा.
  • ३०- ४० सेकंदांनी तुम्हाला लक्षात येईल की टिश्यूने तेल शोषून घेतले आहे.
  • मग टिश्यू काढून टाकून द्या व गरज वाटल्यास साध्या ब्रशने डब्बा अगदी २ सेकंद घासून धुवून घ्या.

हे ही वाचा<< Video: गॅसची आच अर्धवटच पेटते? ‘या’ टिप्स वापरून बर्नर करा स्वच्छ, कुकिंगचा वेळ होईल अर्धा

दरम्यान तुम्ही निर्जंतुकीकरणासाठी या तेलकट डब्ब्यात थोडे मीठ घालून सुद्धा पाण्याने धुवून घेऊ शकता. थोडा लिंबाचा रस घालून या डब्ब्याचा वासही घालवू शकता. हे डब्बे नीट सुकवून मगच वापरा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video how to clean oily stains from tiffin bad smell will be gone in 40 seconds smart kitchen hacks svs
First published on: 26-01-2023 at 14:33 IST