How To Use Pads For Heavy Blood Flow: मासिक पाळी हा विषय सुदैवाने आता उघडपणे चर्चेत येत आहे. अनेक महिलांना या कालावधीत होणारा त्रास व त्यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर सुद्धा प्रयत्न होत असतो. काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या महत्त्वाच्या विषयावर अनेकदा आपल्यासारख्या मैत्रिणींना मार्गदर्शन करत असतात. अशाच एका क्रिएटरने महिलांच्या मनातील सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. अनेक महिलांना मासिक पाळीत पहिल्या व दुसऱ्या दिवशी अतिरक्तस्त्राव होतो. अशावेळी होणाऱ्या वेदनांसह आणखी एक चिंता असते ती म्हणजे कपड्यांवर पडणारे डाग. अनेकदा या रक्ताचे डाग निघतही नाहीत व त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येऊ शकते. हा एकूण त्रास वाचवण्यासाठी आपण पॅड्स वेगळ्या पद्धतीने कसे वापरू शकतो हे एका क्रिएटरने सांगितले आहे. हा नेमका फंडा काय आहे चला पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहसा मासिक पाळीतील रक्तस्त्राव जास्त होत असल्यास एकाऐवजी दोन पॅड्स वापरणे योग्य ठरेल. यासाठी आपण पहिला पॅड हा नियमित पद्धतीने अंतर्वस्त्राला लावून घेऊ शकता व दुसरा पॅड हा आडवा करून नितंबाच्या बाजूने लावावा. जेणेकरून तुमच्या कपड्यांना लागणारे डाग सुद्धा थांबवता येतील. हे नेमकं कसं करायचं हे जाणून घेऊया…

पिरीएड्समध्ये सेक्स केल्यास गर्भधारणा होऊ शकते का? डॉक्टर सांगतात, ओव्ह्युलेशन दिवस कसा ओळखाल?

दरम्यान, सॅनिटरी पॅड्स वापरण्याआधी आपल्या प्रायव्हेट पार्ट्स व मांड्यांना त्वचेच्या प्रकारानुसार साजेशी घाम शोषून घेणारी पावडर लावणे सुद्धा फायद्याचे ठरू शकते. यामुळे तुम्हाला दुर्गंधीचा त्रास कमी करता येईल. तसेच हे पॅड्स ६ ते ७ तासांच्या अंतराने बदलायला विसरू नका. सुरुवातीचे दोन दिवस तरी अशा पद्धतीने पॅड्स वापरणे फायद्याचे ठरू शकते त्यांनतर जसा रक्तस्त्राव कमी होत जातो तसे तुही नियमित उपाय वापरू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video how to use sanitary pads for heavy blood flow easy way to prevent underwear getting stained in middle part jugad to save money svs
First published on: 03-06-2023 at 09:32 IST