How To Save Electricity Bill Through Fridge: उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीजरमध्ये उभे राहिलेले बर्फाचे डोंगर पाहून अनेकदा मनाला गारवा मिळतो पण मंडळी हे तुमच्या महागड्या फ्रिजमध्ये बिघाडाचे लक्षण असू शकते. अनेकदा आपण फ्रीजमधून वस्तू/पाणी बाहेर काढण्यासाठी दार उघडतो खरं पण बंद करताना नीट न तपासल्यास दरवाजा उघडाच राहतो यामुळे बाहेरील हवा फ्रीजमध्ये जाऊन बर्फाचे डोंगर तयार होऊ लागतात. कालांतराने यामुळे फ्रीज पूर्णपणे निकामी सुद्धा होऊ शकतो शिवाय याचा वीज बिलावर होणारा परिणाम तुमच्या खिश्याला सुद्धा हलका करू शकतो. यासगळ्या प्रश्नांवर काही सोपी उत्तरे व उपाय आज आपण पाहणार आहोत.
बहुतांश घरांमध्ये किती प्रयत्न केला तरी फ्रीजचा दरवाजा पूर्णपणे बंद होतच नाही याचे मुख्य कारण म्हणजे दरवाजाला लावलेल्या रबरमध्ये अडकलेली घाण व धूळ. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला हे रबर पूर्ण स्वच्छ व घट्ट करून घ्यायचे आहेत. यासाठी वेगळा खर्च गरजेचा नाही. घरातील कापसाचा गोळा एका हिरव्या किंवा जाड काडीला जोडून आपण फ्रीजचा रबर पुसून काढू शकता. अगदी डीप क्लिनिंग करायचे असेल तर यासाठी साबणाच्या पाण्याचे सोल्युशन ही वापरू शकता. काही युट्युबर्सनी व आपल्यासारख्याच हुशार महिलांनी शेअर केलेल्या टिप्सनुसार दरवाजचे रबर घट्ट होण्यासाठी आपण हेअर ड्रायर वापरू शकता. गरम हवेने हे सैल पडलेले रबर व्यव्यस्थित होऊ शकतात.
सध्या व्हायरल होणारी एक सोपी टीप म्हणजे तुम्ही हे सगळं करत असताना किंवा झाल्यावर एक कागद फ्रीजच्या दरवाज्यामध्ये धरा व दार बंद करा जर तुम्ही हा कागद खेचून बाहेर काढला तर अजूनही रबर सैलच आहे समजा जर कागद निघाला तर मात्र रबर योग्य स्थितीत आहे हे समजून जा.
एक कागद वाचवेल विजेचे बिल?
हे ही वाचा<< चहामध्ये एकवेळ (कमी) साखर चालेल पण ‘हा’ पदार्थ नकोच?WHO ने स्पष्ट सांगितले होणारे ‘हे’ गंभीर परिणाम
तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून पाहू शकता यामुळे फ्रीजमध्ये तयार होणारे बर्फाचे डोंगर टाळू शकता तसेच यामुळे तुमच्या फ्रीजमुळे विजेच्या बिलामध्ये होणारी वाढ सुद्धा नियंत्रणात ठेवू शकता. तुम्हाला कसा रिझल्ट येतोय हे कमेंटमध्ये नक्की कळवा .