Hair Care Mistakes Shared By Nita Ambani Stylist: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा जगभरात सुरु आहे. या सोहळ्यातील सेलिब्रिटी पाहुण्यांच्या वेगवेगळ्या लुकने, डान्सने, फोटो पासून ते अगदी त्यांच्या राहण्यासाठी केलेल्या तंबूमधील सुख- सुविधांनी सुद्धा सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे जगातील मोठमोठे सेलिब्रिटी हजर असतानाही वरमाय म्हणजेच नीता अंबानी यांच्या लुकनेच नेटकऱ्यांना सर्वाधिक भुरळ घातली आहे. प्री वेडिंगमधील एका कार्यक्रमात नीता यांनी मरून रंगाचा गाऊन परिधान केला होता ज्यावर अगदी साधीच पण देखणी अशी फ्रेंच बन हेअर स्टाईल केली होती. हा बन सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर याने केला होता. नीता अंबानी यांच्या तयारीच्या दरम्यानचा एक रील सुद्धा अमितने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओ व्यतिरिक्त सुद्धा अमितचे अनेक रील्स तुफान व्हायरल झालेले आहेत हे त्याच्या अकाउंटवरील व्ह्यूजचे आकडे पाहून लक्षात येते. अमित आपल्या फॉलोवर्सना केसाची काळजी कशी घ्यावी याविषयी टिप्स देत असतो.

अमित ठाकूरने शेअर केलेल्या एका रीलमध्ये त्याने केस तुटणे थांबवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत, विशेष म्हणजे एक नवा रुपयाही खर्च न करता फक्त तुमच्या काही सवयी बदलून तुम्हालाही काळजी घेता येणार आहे. या टिप्स जाणून घेऊयात..

१) अमित सांगतो की, सगळी कामं उरकल्यावर रात्री केस धुवून झोपायची काहींना सवय असते, असे करताना केस ओले ठेवून कधीच झोपू नये. कारण एकतर केस ओले असताना सर्वात दुबळे असतात त्यात झोपेत त्यांची ओढाताण झाल्यास केस पटकन तुटू शकतात.

२) केस हलके ओले असताना किंवा थंड असताना त्यावर स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग मशीन फिरवू नये. इस्त्री वगैरे फिरवण्याचा प्रकार तर चुकूनही करू नये. यामुळे केस तुटण्याची शक्यता असतेच पण त्याच बरोबर स्प्लिट्स एंड्स सुद्धा वाढू शकतात.

३) तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे झोपताना कधीच केस मोकळे सोडून झोपू नका. यामध्ये खेचल्याने केस तुटू शकतात ही शक्यता जरी बाजूला ठेवली तरी अनेकदा बेडशीट आणि केसाचे फ्रिक्शन होऊन (घासले जाऊन) सुद्धा केस सहज तुटून पडू शकतात.

हे ही वाचा << यशस्वी ‘सीईओ’च्या पालकांनी सांगितली पंचसूत्री; तुम्ही स्वतःला कसं बदलावं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित यांनी सुचवल्याप्रमाणे आपण झोपताना सैलसर वेणी घालून किंवा पोनी बांधून झोपू शकता. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा.