Viral Video : सोशल मीडियावर अनेक नवनवीन रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रेसिपीचे व्हिडीओ खूप हटके असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला घरी ही रेसिपी करावीशी वाटते. तुम्ही कधी कोथिंबीर वडी खाल्ली आहे का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आज्जीने कोथिंबीर वडी कशी बनवायची, याची एक सोपी रेसिपी सांगितली आहे. इन्स्टाग्रामवर आज्जीने या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
साहित्य
कोथिंबीर
जिरे
लसूण
हिरवी मिरची
मीठ
बेसन
मक्याचे पीठ/तांदळाचे पीठ
पांढरे तीळ
ओवा
हळद
तेल
कृती
सुरुवातीला कोथिंबीर नीट तोडून घ्यावी. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यानंतर ती बारीक चिरून घ्यावी.
जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ घ्यावे आणि मिक्सरमधून बारीक करावे आणि हे मिश्रण बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये टाकावे.
त्यात पाव वाटी बेसनाचे पीठ, पाव वाटी मक्याचे पीठ, पांढऱ्या तीळ, ओवा, हळद टाकावे. सर्व मिश्रण एकत्र करावे आणि पाण्याच्या मदतीने मिश्रण नीट मळून घ्यावे.
पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला तेल लावावे आणि मिश्रमाचा गोळा करावा.
त्यानंतर एक स्टिलची चाळणी घ्यावी. त्या चाळणीला तेल लावावे. आणि त्यावर या मिश्रणाचे दोन लांबसर गोळे बनवून ठेवावे.
त्यानंतर गॅस किंवा चुलीवर एक पातेले ठेवावे त्यात पाणी टाकावे आणि त्यात स्टँड ठेवून त्यावर ही स्टिलची चाळणी ठेवावी. वरून ताट झाकावे.
काही वेळाने हे गोळे वाफेवर शिजवल्यावर त्याच्या बारीक वड्या कराव्यात. त्यांनतर गॅस किंवा चुलीवर तवा गरम करावा. त्यावर तेल टाकावे आणि वड्या नीट दोन्ही बाजूने तेलात भाजून घ्याव्यात. कोथिंबीरच्या वड्या तयार होईल.
पाहा व्हिडीओ
aapli_aaji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोथिंबीर वडी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना आज्जीची ही रेसिपी खूप आवडली आहे. या आज्जीचे नाव सुमन धमाने असून आपली आज्जी या नावाने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. यावर ती तिचे रेसिपीचे व्हिडीओ शेअर करत असते.तिच्या प्रत्येक व्हिडीओवर हजारो लाइक्स आणि लाखो व्ह्युज असतात. तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण तिच्या रेसिपी आवडीने बघतात.