Money Saving Kitchen Jugaad: महागाईच्या काळात एक एक पैसा वाचवणं हीच उद्याच्या कमाईची सुरुवात असते असं म्हणतात. काटकसर करण्यात भारतीयांची सर कोणालाच येणार नाही. मागील काही दिवसांमध्ये जेव्हा टॉमेटो महाग झाले होते तेव्हा तर भारतीयांनी असे भन्नाट पर्याय वापरायला सुरुवात केली होती की त्याला तोडच नाही. काटकसरीचाच एक भाग आपण घरी जेव्हा नवी तेलाची पिशवी आणता तेव्हा सुद्धा पाहिला असेल. एखादी मुरलेली गृहिणी कधीच तेलाची पिशवी फोडल्यावर, तेल ओतून झाल्यावर कचऱ्याच्या डब्यात फेकून देत नाही. उलट ही पिशवी पद्धतशीर घडी करून चपात्यांच्या डब्यात ठेवली जाते जेणेकरून पिशवीला लागलेल्या तेलाचाही पुरेपूर वापर होईल.

एकीकडे तुम्ही अशी बचत करता पण दुसरीकडे जेव्हा तेलाची पिशवी रिकामी करायची असते तेव्हा अरुंद तोंडाच्या कॅन किंवा बाटलीमध्ये तेल ओतताना अनेकदा तोच ओघळ बाटलीबाहेर जातो आणि त्यात कितीतरी तेल वाया जाते. अशावेळी शंकूसारख्या आकाराचे फनेल वापरले जाते पण का माहिती नाही नेमकं जेव्हा गरज असते तेव्हाच हे फनेल सापडेनासं होतं. मास्टरशेफ कुणाल कपूर यांनी आता विना फनेल थेंबभर तेल वाया जाऊ न देता बाटलीत भरण्याचा जुगाड सांगितला आहे. यासाठी तुम्हाला फक्त एखादी चॉपस्टिक किंवा मोठी टूथपिक गरजेची आहे.

Video : तेलाची पिशवी अरुंद तोंडाच्या बाटलीत ओतताना थेंबभरही तेल वाया घालवू नका

हे ही वाचा<<एक महिना मैदा न खाल्ल्यास वजन, शुगर खरंच कमी होते का? मैदा बंद करण्याचे शरीरासाठी तोटे व फायदे वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला हा जुगाड कसा वाटला? तुम्ही या व्यतिरिक्त कोणता उपाय करता का? असेल तर याचे उत्तर आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.