Keep Salt in Your Fridge and See the Magic: घराघरात वापरला जाणारा फ्रिज… फळं, भाज्या, दूध, पाणी आणि थंडगार आईस्क्रीमसाठी आपण रोज उघडतो. पण एक प्रश्न विचारू का? तुम्ही कधी फ्रिजमध्ये मीठ ठेवलं आहे का? हो, अगदी साधं स्वयंपाकघरातलं मीठ. ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल. “मीठ फ्रिजमध्ये? हे काय वेडेपण आहे?” असं तुम्हाला नक्कीच वाटेल. पण, हा भन्नाट जुगाड ऐकला तर तुम्हीही आजच फ्रिजमध्ये मीठ ठेवायला लागाल.
सोशल मीडियावर सध्या हा प्रयोग जोरात व्हायरल होतो आहे. एका व्हिडीओत दाखवलंय की फ्रिजमध्ये फक्त थोडंसं मीठ ठेवून तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. होय, फ्रिजच्या देखभालीसाठी आपण जेव्हा-तेव्हा मेकॅनिकला बोलावतो तो अतिरिक्त खर्च टाळता येईल. तुमच्या पैशांची बचत होईल.
बचत तुम्हाला माहिती आहे का, सिंगल डोअर फ्रिज असला की फ्रिजरमध्ये सतत बर्फाचा डोंगर जमा होतो. एवढा बर्फ होतो की भांडं ठेवायलाही जागा नसते. बर्फ काढण्यासाठी फ्रिज बंद करून तासनतास वाट पाहावी लागते. विजेचा अपव्यय वेगळाच. आता कल्पना करा, हे सगळं टेन्शन न घेता फक्त “एक चमचा मीठ” टाकून हा बर्फ गायब होईल, तर? हो, अगदी खरं! फ्रिजर एकदा स्वच्छ करून त्यात थोडंसं मीठ पसरवा. झालं! आता फ्रिजरमध्ये जास्त बर्फ जमा होणारच नाही. बर्फाचा डोंगर होऊन तुम्हाला त्रास देणार नाही.
थांबा, अजून एक भन्नाट जुगाड आहे!
एका वाटीच्या तळाशी थोडंसं तेल लावा आणि ती वाटी फ्रिजरमध्ये ठेवा. मग काय, फ्रिजरमध्ये ठेवलेली भांडी बर्फाला चिकटणारच नाहीत. नेहमीसारखं बर्फ वितळेपर्यंत थांबायचं काम संपलं.
म्हणजे थोडक्यात, मीठ आणि तेलाच्या या दोन साध्या ट्रिक्स तुमच्या घरचा फ्रिज नव्यासारखा ठेवतील. अनावश्यक खर्च टळेल, विजेची बचत होईल आणि तुम्ही नेहमी म्हणाल, “फ्रिजमध्ये मीठ ठेवलं आणि खरंच चमत्कार झाला!”
येथे पाहा व्हिडीओ
Maa, yeh kaise karun? या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का ते आम्हाला कमेंट करून कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)