Grandma Shares Easy Home Remedies for Mouth Ulcers : तोंडाचे आरोग्य हे फक्त दातांच्या स्वच्छतेपुरतेच मर्यादित नसते. तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात कमजोर होणे या सगळ्या समस्यांबरोबर सतत तोंड येणे ही समस्या तर अगदी सामन्याचा आहे. एखादा गोड पदार्थ खाल्ला की, अनेक जणांना हमखास तोंड येते. यामुळे बोलण्यास, खाण्यास आणि पिण्यास देखील त्रास होतो. यासाठी अनेकदा आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. पण, सतत डॉक्टरकडे जाण्यापेक्षा या समस्येवर काही घरगुती उपचार फायदेशीर ठरतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये आजीने काही घरगुती उपाय सांगितले आहेत; जे कदाचित तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
आजी चुलीजवळ बसून तोंड आल्यावर घरच्या घरी कसा उपाय करावा याबद्दल सांगत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक पदार्थ कशाप्रकारे लावायचा याबद्दलही त्यांनी व्हिडीओत सविस्तर सांगितले आहे.
१. साजूक तूप – तोंड आलेल्या ठिकाणी थोडंसं तूप लावलं की, जखम बरी होते.
२. हिरवी कोथिंबीर – २ ते ३ वेळा दिवसातून बारीक चावून खायची.
व्हिडीओ नक्की बघा…
३. सुखं खोबरं – एकदम बारीक चावून खायचे..
४. इलायची आणि मध – इलायची पावडरमध्ये मध घालून मिक्स करा आणि तोंड आलेल्या ठिकाणी लावून घ्या.
५. हळद आणि मध – हळद आणि मध यांचे मिश्रण जखम लावलेल्या ठिकाणी लावा.
मसालेदार खाऊ नये आणि सतत तोंड येत असेल तर मेडिकलमधून व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्या असे त्यांनी व्हिडीओत सांगितले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aapli_aaji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.