Gas Burner Cleaning Video : आपले घर नीटनेटके आणि स्वच्छ दिसावे यासाठी आपली आई नेहमीच प्रयत्न करत असते. अशातच स्वपयंपाकघर म्हणजे तिच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. आईला जेवण करताना लागणारे महत्त्वाचे साधन म्हणजे गॅस. त्यामुळे वर्षातून एकदा गॅस योग्यरीत्या ठेवला आहे का, लायटर, रेग्युलेटर, गॅस पाइप, शेगडीचे बर्नर, गॅस चालू-बंद करण्याचा स्विच या सगळ्याच गोष्टींची नियमित तपासणी करावी लागते. खासकरून त्यातल्या गॅस बर्नरला स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे असते. ज्यावेळी बर्नरवर तेल, मसाले किंवा अन्नपदार्थ पडतात, तेव्हा गॅस बर्नर बिघडू शकतो. पण, आता तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये काळाकुट्ट झालेला गॅस बर्नर स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक दाखवण्यात आली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा गॅस बर्नरच्या छिद्रांमध्ये टूथपिक लावून ठेवा. त्यानंतर एका बाउलमध्ये गॅस बर्नर ठेवा आणि एक पॅकेट इनो व लिंबाचा रस त्यात घाला. मग चमच्याच्या साह्याने मिश्रण हलवून घ्या. नंतर त्यात गरम पाणीसुद्धा घाला. त्यानंतर काही सेकंदांनी गॅस बर्नर हातात घेऊन, तो ब्रशने स्वच्छ करा किंवा घासून काढा.
गॅस बर्नर स्वच्छ करण्याची खास ट्रिक (Viral Video)
नंतर पुन्हा एकदा गॅस बर्नरवर भांडी घासण्याचे द्रावण (विम लिक्विड) टाका आणि ब्रशने स्वच्छ करून घ्या. अशा प्रकारे तुमचा गॅस बर्नर एकदम नव्यासारखा दिसेल. आपले घर आणि घरातील प्रत्येक वस्तू एकदम स्वच्छ आणि चकचकीत असावी, अशी आपली इच्छा असते. रोजच्या धावपळीत जीवनात सगळ्याच गोष्टी स्वच्छ करणे एवढे शक्य नसते. पण, गॅस बर्नर स्वच्छ करण्याचा हा सोपा जुगाड तुमचा वेळही वाचवेल आणि कष्ट न करता अगदी काही मिनिटांत तुमचा गॅस बर्नर चकचकीत, नव्यासारखा दिसेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mini_stars95 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
त्याचप्रमाणे घरोघरी वापरल्या जाणाऱ्या या गॅस कनेक्शनची सुरक्षा ही प्रत्येक ग्राहकाची जबाबदारी आहे. कधीतरी गॅसबाबत काही बिघडले, तर आपण तो दुरुस्त करण्यासाठी गॅस एजन्सीला फोन करून संबंधित व्यक्तीला बोलावतो. परंतु, खरं तर गॅस हा वर्षातून किंवा दोन वर्षांतून एकदा तपासून घ्यायला हवा. कारण- तो कुठे लिकेज होत नाही ना हे ठरावीक दिवसांनी तपासणे सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे.