सध्या इंटरनेटवर एका तीन वर्षांच्या मुलाचा तायक्वांदो बोर्ड तोडतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत असलेल्या या लहान मुलाला ‘व्हाईट बेल्ट’ मिळविण्यासाठी अनवाणी पायाने एक तायक्वांदो बोर्ड तोडण्याची परीक्षा द्यावी लागणार होती. सुरूवातीला प्रशिक्षकाने या मुलाला तायक्वांदो बोर्ड कसा तोडायचा हे नीट समजावून सांगितले. मात्र, त्यानंतर या लहानग्याने बोर्ड तोडण्यासाठी केलेले प्रयत्न पाहताना अनेकांना हसू फुटले. अखेर खूप प्रयत्न केल्यानंतर त्याने तायक्वांदो बोर्ड तोडला आणि ‘व्हाईट बेल्ट’ मिळवला. मात्र, यादरम्यानच्या त्याच्या कसरती पाहताना अनेकांचे चांगलेच मनोरंजन झाले. इंटरनेटवर तब्बल १० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2015 रोजी प्रकाशित
तीन वर्षाच्या मुलाचा तायक्वांदो बोर्ड तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल
सध्या इंटरनेटवर एका तीन वर्षांच्या मुलाचा तायक्वांदो बोर्ड तोडतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

First published on: 01-09-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video little boy tries hard to break taekwondo board