Creative Shoe Storage Viral Video : बाहेरून आल्यानंतर काही जण दारात तर अनेक जण घराच्या आतमध्ये शूज घेऊन येतात. कितीही चप्पल, सॅन्डल, बूट ठेवायला कपाट आणलं तरीही अनेक जण घरामध्येच इथे-तिथे चप्पल फेकून देतात. या सवयीमुळे घरातील राहण्याची जागा अधिक अस्वच्छ होते. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या समस्येचे निराकरण नक्की कसे करायचे. तर एका इन्स्टाग्राम युजरने एका जुन्या फ्रिजचा त्याच्या क्रॉक्स वापरण्यासाठी भन्नाट उपयोग केला आहे. काय आहे हा जुगाड चला पाहूयात…

इन्स्टाग्राम युजर त्याचे क्रॉक्स नेहमी घरात इथे-तिथे फेकून द्यायचा. त्यानंतर भंगार वेचकाकडे एक जुना फ्रिज पाहून त्याला एक जुगाड सुचला. युजरने या फ्रिजचा उपयोग त्याचे क्रॉक्स ठेवण्यासाठी करायचा विचार केला. सगळ्यात आधी त्याने फ्रिज स्वच्छ धुवून घेतला. फ्रिजमध्ये असणारे शेल्फ्स काढून त्याने कस्टम लाकडी स्लायडर्स बसवले. त्यानंतर रंगकाम करून संपूर्ण फ्रिजला अगदी नव्यासारखा लूक दिला. खडूच्या रंगांचा वापर करून, त्यांनी पारंपारिक भारतीय लोककला शैलीतील रंगीत मधुबनी कलाकृती काढून त्याला अगदी मनापासून रंगवली.

टाकाऊपासून टिकाऊ

एखाद्या टाकाऊ वस्तूपासून उपयुक्त अशी वस्तू तयार करण्याची कला सर्वांनाच अवगत असते असे नाही. आपल्या घरात कितीतरी वस्तू असतात ; ज्या आपण काही दिवस वापरून फेकून लगेच फेकून देतो. कधी कधी तर चांगल्या असलेल्या वस्तूचीही आपण विनाकारण विल्हेवाट लावून टाकतो. मात्र वस्तूचा दुहेरी उपयोग करू शकतो हे बहुदा आपण विसरूनच जातो. तर आज सोशल मीडियावर जुन्या फ्रिजचा तुम्ही तुमच्या खास चप्पल ठेवण्यासाठी उपयोग करू शकता याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @createyourtaste आणि @crocsindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुमच्या शूज ठेवण्यासाठी अशा वेगवेगळ्या जुन्या वस्तूंचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ – तुमचे शूज, सॅन्डल ज्या बॉक्स तुम्हाला दुकानातून पार्सल पाठवले जातात. त्याचे एक कॅलेक्शन करून तुम्ही छोटेसे चपलांचे कपाट बनवू शकता किंवा अगदी व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे जुन्या फ्रिजचा उपयोग सुद्धा करू शकता.