Vivo V15 Pro हा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ ठरु शकते. कारण, कंपनीने या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केलीये. कंपनीने या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटच्या किंमतीत 3 हजार रुपयांची कपात केली आहे. तर, याच स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज क्षमता असलेल्या व्हेरिअंटच्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे.

1 ऑगस्टपासून या नव्या किंमती लागू झाल्या आहेत. नव्या किंमतीनुसार या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटसाठी तुम्हाला आता 23 हजार 990 रुपये द्यावे लागतील, तर टॉप व्हेरिअंटची नवी किंमत 26 हजार 990 रुपये झाली आहे. नव्या किंमतीत हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाँच करतेवेळी 32MP पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला हा जगातील पहिला फोन असल्याचा दावा व्हिवो कंपनीने केला होता.

पॉप-अप कॅमेरा –
Vivo V15 Pro मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं असून 0.37 सेकंदांमध्ये फोन अनलॉक होईल असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा डिस्प्लेच्या मागे लपलेला आहे आणि सेल्फीसाठी क्लिक केल्यानंतर कॅमेरा आपोआप पॉप-अप होतो.

फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप –
या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप म्हणजेच तीन कॅमेरे असतील. तीन कॅमेऱ्यांपैकी 48 मेगापिक्सलचा एक प्रायमरी कॅमेरा आणि याशिवाय 8 व 5 मेगापिक्सलचे दोन अन्य कॅमेरा असतील.

किंमत –
या फोनमध्ये ६.३९ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून फोनमध्ये क्वॅालकॅम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर असणार आहे. या व्यतिरीक्त हा फोन Android Pie ऑपरेटींग सिस्टमवर चालेल. यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल, मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. 28 हजार 990 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे.