भन्नाट ऑफर : ‘फ्री’मध्ये दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता सात दिवसांपर्यंत दररोज मोफत 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग…

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी दररोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता ही ऑफर कंपनीकडून ग्राहकांना दिली जात आहे.

व्होडाफोन-आयडियाच्या या ऑफरची वैधता सात दिवस आहे. म्हणजे सात दिवसांपर्यंत ग्राहकांना दररोज मोफत 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. एकूण 14 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळेल. ही ऑफर पूर्णतः मोफत असेल पण त्यासाठी तुमच्याकडे व्होडाफोन-आयडियाचा कोणताही अॅक्टिव्ह प्लॅन असणे आवश्यक आहे.  मात्र, ही ऑफर कंपनीकडून काही निवडक ग्राहकांनाच दिली जात आहे. ट्विटरवर काही व्होडाफोन युजर्सनी 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग बेनिफिट्स मिळाल्याची माहिती शेअर केली आहे. व्होडाफोनच्या या ऑफरबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 121363 डायल करु शकता. जर, तुम्हाला ही ऑफर लागू होत असेल तर त्याबाबत तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. जर, ऑफर लागू होणार नसेल तर व्हॉइस मेसेजद्वारे तसं सांगितलं जाईल.

यापूर्वी, व्होडाफोन-आयडियाने 299 रुपये, 449 रुपये आणि 699 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर डबल डेटा ऑफरचीही घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओही आपल्या काही निवडक ग्राहकांना चार दिवस मोफत 2GB अतिरिक्त मोबाइल इंटरनेट डेटा देत असल्याचं समोर आलं होतं. ‘Jio Data Pack’ अंतर्गत कंपनी काही निडक ग्राहकांना दररोज 2GB एक्स्ट्रा डेटा देत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vodafone idea offers free 2gb high speed data and unlimited voice calls to selected users know details sas

ताज्या बातम्या