आजकाल जवळपास प्रत्येक घरामध्ये वॉशिंग मशीन वापरली जाते कारण त्यामध्ये झटपट कपडे धुतले जातात. फार कष्ट न घेता आपले कपडे धुण्याचे काम सोपे होते. आजच्या काळात अशा वॉशिंग मशीन बाजारात आल्या आहेत ज्यामध्ये कित्येक मोड असतात ज्याच्या मदतीने आपण सिल्कपासून वूलनपर्यंत नाजू कपड्यांची सफाई करू शकतो. कित्येक लोकांच्या मते लोकरी कपड्यांमध्ये जर वॉशिंग मशीनमध्ये धुतले तर कपड्यांना धाग्यांचे गोळे येऊ लागतात आणि जे पटकन जात नाही. ज्यांच्या घराता मांजर किंवा कुत्रा पाळलेला असतो त्यांना ही समस्या जास्त जाणवते. कपड्यांमध्ये पाळीव प्राण्यांचे केस चिकटतात आणि वॉशिंगमशीनमध्ये धुतल्यानंतरही साफ होत नाही. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सोपी ट्रिक वापरून पाहा आणि या समस्या दूर करा.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ही गोष्ट वापरा
तुम्ही वेट वाईप्सबाबत ऐकले असेल. आजकाल, वेगवेगळ्या प्रकारचे वेट वाईप्स बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकी बेबी वाइप्स आणि मेकअप रिमूव्हर ओले वाइप्स खूप सामान्य आहेत. आत्तापर्यंत तुम्ही त्यांचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरला असेल, पण तुम्हाला माहित आहे का की, जर तुम्ही हे वाइप्स वॉशिंग मशिनमध्ये ठेवले तर ते कपडे अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यास मदत करू शकतात.
हेही वाचा – हिवाळ्यात गाजराचे लोणचे का खावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे, नोट करा सोपी रेसिपी
अशा प्रकारे वापरा
कोणत्याही प्रकारचे दोन वेट वाईप्स घ्या आणि कपड्यांसह वॉशिंग मशीनच्या टबमध्ये ठेवा. आता सामान्य मोडवर वॉशिंग मशीन चालू करा. असे केल्याने कपड्यांवर अडकलेले धागे आणि केस सहज स्वच्छ होतील आणि कपड्यांना नवीन चमक मिळेल.
या गोष्टींची काळजी घ्या
जर तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये स्वेटर, जॅकेट किंवा मखमली कपडे इत्यादी धुत असाल तर ही युक्ती त्यांच्यावर सहज कार्य करेल.
जर तुम्ही एकाच वेळी जास्त कपडे धुत असाल तर २ पेक्षा जास्त वेट वाईप्स वापरल्यास ते चांगले होईल.