How to Use Washing Machine: आजकाल घरकाम सोपं करण्यासाठी वेगवेगळी उपकरणं आलेली आहेत. त्यातलं एक महत्वाचं उपकरण म्हणजे वॉशिंग मशीन. आज लोक फक्त ३० मिनिटांत खूप सारे कपडे धुतात, तेही स्वतः मेहनत न करता. फक्त कपडे आणि सर्फ मशीनमध्ये टाकायचं आणि मशीन चालू केली की कपडे आपोआप धुऊन निघतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना इतका वेळही नसतो की ते दोन तास बाथरूममध्ये बसून हाताने कपडे धुतील. लोक बऱ्याचदा मशीनमध्ये कपडे टाकतात पण एकदम खूप सारे टाकतात, ज्यामुळे मशीन ओव्हरलोड होते.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अशामुळे कपडे नीट धुतले जात नाहीत आणि मशीनच्या मोटरवर ताण येतो, ज्यामुळे कधी कधी आगसुद्धा लागू शकते. चला, तर मग बघूया की वॉशिंग मशीन वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
वॉशिंग मशीन वापरताना ‘ही’ काळजी घ्या (Washing Machine Using Tips)
- अनेक लोकांनी अलीकडेच नवीन वॉशिंग मशीन घेतलं आहे, त्यांना फार काळजी करण्याची गरज नाही. पण असंही करू नका की मशीनमध्ये एकदम क्षमतेपेक्षा जास्त कपडे टाकाल. असं केल्याने मोटरवर ताण येतो.
- तुमचं वॉशिंग मशीन जुनं झालं असेल तर त्यात कपड्यांचा ओव्हरलोड करू नका. जर तुम्ही वारंवार मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे टाकून धुतले, तर त्यावर लोड वाढेल, मशीन गरम होईल आणि शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.
- मशीनची मोटर नीट काम करत नसेल किंवा ड्रम फिरताना काही आवाज येत असेल, तर लगेच मशीन तपासून घ्या. नाहीतर मोटर जळू शकते आणि काही अपघातही होऊ शकतो.
- खूप वेळा चाइल्ड लॉक लावलेलं नसल्यामुळे मुलं वॉशिंग मशीन स्पिन मोडमध्ये असतानाच दरवाजा उघडतात. हे धोकादायक ठरू शकतं. स्पिन मोडमध्ये ड्रायरचं झाकण उघडलं गेलं तर मशीन अचानक थांबतं, आणि त्यामुळं ब्लास्ट होण्याचा धोका असतो.
- वॉशिंग मशीनची वायर जुनी झाला असेल, मधूनच कट झाली असेल तर तो लगेच बदलून घ्या. यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. त्यामुळे घरात आग लागण्याची शक्यता असते.
- कंट्रोल पॅनल, प्लग, सर्किट वगैरेमध्ये पाणी जाऊ देऊ नका. इलेक्ट्रॉनिक वस्तूंना नेहमी पाण्यापासून दूर ठेवा. नाहीतर करंट लागू शकतो. मशीनच्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये पाणी गेलं तर मशीन बिघडण्याचा धोका असतो.
- मशीनची साफसफाई नियमितपणे करणेही गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही रोज कपडे धुतात, तेव्हा त्यातील मळ आणि घाण एका छोट्या बॉक्समध्ये जमा होत राहते. प्रत्येक मशीनचं सिस्टम वेगळं असतं. त्यामुळे ती घाण काढून टाकणंही महत्त्वाचं आहे.
- मशीन थेट उन्हामध्ये ठेवू नका. जर तुम्ही ती बाल्कनीत ठेवत असाल, तर तिथं सावलीसारखं काहीतरी असावं. तुम्ही मशीनला कव्हर घालूनही ठेवू शकता.