How To Cook Rice For Weight Loss: महाराष्ट्रात प्रत्येक घरात निदान दिवसातून एकदा भात शिजतोच. तांदूळ हे मुलाकातच एक बहुपयोगी धान्य आहे. तांदूळ, विशेषत: पांढरा बासमती तांदूळ, हा आयुर्वेदिक आहार पध्दतीतील मुख्य अन्न आहे कारण तो शिजवण्यास, पचण्यास सोपा, चवदार आणि सर्व पाककृतींमध्ये सहज वापरता येण्यासारखा प्रकार आहे. पण आपल्याकडे अनेकांचा असा समज आहे की भात खाणे हे वजन वाढण्यामागचे मुख्य कारण असते, अर्थात भात हा कार्ब्सचा स्रोत असल्याने असे समज होणे स्वाभाविक आहे पण तुम्ही जर योग्य पद्धतीने, प्रमाणात व वेळेत तांदूळ शिजवून भात तयार केला तर याने उलट तुम्हाला वजन कमी करण्यात सुद्धा मदत होऊ शकते. आज भात बनवण्याची एक सोपी पण प्रभावी आयुर्वेदिक पद्धत आपण पाहूया…

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ वैशाली शुक्ला यांनी तांदूळ शिजवण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे. त्या सांगतात की प्रेशर कुकरच्या तुलनेत खुल्या भांड्यात (टोप/ पातेले) याध्ये भात शिजवणे केव्हाही चांगले असते. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने भात कसा शिजवायचा ते जाणून घ्या:

स्टेप 1: तांदूळ शिजवण्यापूर्वी किमान 2-4 वेळा धुवा.यामुळे तांदळावर पॉलिश केले असल्यास, धूळ आणि इतर घाण काढून टाकण्यास मदत होते.
स्टेप 2: पाणी उकळवा आणि धुतलेले तांदूळ 1:4 च्या प्रमाणात घाला (तांदूळ: पाण्याचे प्रमाण)
स्टेप 3: तांदूळ 15 मिनिटांत शिजत असताना अधूनमधून ढवळत रहा.
स्टेप 4: तांदूळ शिजला की, जास्तीचे पाणी काढून टाका, झाकणाने झाकून ठेवा आणि 10 मिनिटे राहू द्या.
स्टेप 5: गरम सर्व्ह करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय तुम्हाला भात कसा हवा आहे यानींसार तुम्ही तांदूळ निवडतानाच नीट काळजी घ्यायला हवी. छोट्या दाण्याचा तांदूळ जसा की इंद्रायणी हा चिकटच असतो त्यामुळे तुम्हाला फडफडीत भात खायचा असेल तर तांदूळ नीट निवडा.तांदूळ धुताना थंड पाणी वापरा. यामुळे अतिरिक्त स्टार्च निघून जाते व भात फुलून येतो.अशा प्रकारे भात शिजवल्याने वजन वाढणारे स्टार्च निघून जातात व आपण भात खाऊनही डाएट फॉलो करू शकता.