Healthy Breakfast for Kids: मॅगी, बर्गर, पिझ्झा, चिप्स अशा प्रकारचे अनेक पदार्थ मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योग्य आणि पुरेसा आहार घेणे गरजेचे असते. परंतु, काही पालक जेवण बनवण्याचा कंटाळा म्हणून किंवा मुलांच्या हट्टापायी त्यांना बाहेरचे पदार्थ खाऊ घालतात. मुलांसाठी पालकांना अशी बऱ्याच बाबतीत मेहनत घ्यावी लागते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलांना काय काय खायला द्यायचे याची यादीचं काही जण तयार करतात. दिवसभर मुलांमध्ये एनर्जी राहावी यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. आरोग्याच्या दृष्टीने मुलांच्या नाश्त्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता ते पाहू…
मुलांच्या नाश्त्यात या पदार्थांचा करा समावेश
पोहे
लहान मुलांना पोहे खूप आवडतात. पोहे मुलांच्या शारीरिक विकासासाठी मदत करतात, त्यामुळे तुम्ही पोह्याचा समावेश मुलांच्या नाश्त्यामध्ये करू शकता.
पनीर
पनीरमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम दोन्ही मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे पनीर खाल्ल्याने मुलांचे दात आणि हाडं मजबूत होण्यास मदत होईल.
सँडविच
घरी बनवलेले सँडविचही मुलांसाठी एक उत्तम नाश्ता आहे. यात प्रथिने आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने मुलं दिवसभर सक्रिय राहतात.
अंडी
मुलांच्या नाश्त्यामध्ये तुम्ही अंड्यांचा समावेशदेखील करू शकता. शिजवलेले किंवा एखाद्या वेगळ्या रेसेपीमधून मुलांना अंडी देऊ शकता.
पावसाळ्यात आवर्जून प्या ‘हे’ निरोगी पेय, ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर
शिरा/ उपमा
कधी गोड शिरा तर कधी उपमा यापैकी त्यांच्या आवडीनुसार तुम्ही हा पदार्थ बनवू शकता, रवा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
मिक्स व्हेज पराठा
या पराठ्यामध्ये विविध भाज्यांचा वापर केला जातो. त्यामुळे मिक्स व्हेज पराठा मुलांसाठी उत्तम नाश्ता आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, लोह भरपूर प्रमाणात आढळते.