​Benefits of applying ice to the face in every morning : स्वच्छ आणि सुंदर त्वचा दिसण्यासाठी आपण विविध प्रकारचे फेसवॉश, लोशन, घरगुती उपचार, किंवा डॉक्टरांकडून ट्रीटमेंट सुद्धा करून घेतो ; ज्यामुळे आपला चेहरा तेजस्वी आणि सुंदर दिसतो. काही जण तर अगदी चेहऱ्यावर बर्फ देखील लावतात. पण, चेहऱ्यावर बर्फ वापरण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? नाही… तर आज आपण या बातमीतून चेहऱ्यावर बर्फ कसा लावायचा, चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

त्वचेला थंडावा देण्याव्यतिरिक्त, चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते. आजकाल, अनेक सौंदर्य तज्ज्ञ त्वचेच्या काळजीच्या दिनचर्येत आईस थेरपीचा समावेश करण्याची शिफारस करतात.

तर चेहऱ्यावर बर्फ कसा लावायचा (How to apply ice to the face)

  • बर्फ कधीही थेट त्वचेवर लावू नये. नेहमी बर्फ सुती कापडात किंवा कापसात गुंडाळा आणि नंतर तो चेहऱ्यावर लावावा.
  • १ ते २ मिनिटांपेक्षा जास्त काळ चेहऱ्यावर बर्फ लावू नका.
  • आठवड्यातून फक्त ४ ते ५ वेळा बर्फ लावा.

चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे फायदे (Benefits of applying ice to the face)

सूर्यप्रकाशापासून आराम (Relief from sunburn)

उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे त्वचेची आग होते. त्यामुळे अशा परिस्थितीत, चेहऱ्यावर बर्फ लावल्याने उन्हापासून आराम मिळतो आणि त्वचेला थंडावा मिळतो.

चेहऱ्यावरील सूज कमी करते (Reduces facial puffines)

सकाळी उठल्यावर बर्फ लावल्यास चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या अरुंद करून, चेहऱ्याची सूज निर्माण करणारे अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करतात .

मुरुमांपासून आराम (Relief from pimples)

बर्फ चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यास मदत करतो. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे येत असतील तर बर्फ लावल्याने आराम मिळतो आणि वेदना देखील कमी होतात.

मेकअप बराच काळ टिकतो (Makeup lasts a long time)

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा गुळगुळीत होते आणि एचडी मेकअप जास्त काळ टिकतो. याशिवाय, मेकअप लावण्यापूर्वी ते प्राइमर म्हणून काम करते.

त्वचा उजळ दिसते (Make skin brighter)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या उजळ दिसतो आणि चमकदार राहतो .