Delicate Dumping : डेटिंग हा एक शब्द राहिला नसून ही आजकालच्या पिढीची जीववशैली झाला आहे. एखाद्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्यासोबत काही वेळ घालवणे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये एखाद्या खास व्यक्तीसह कॉफी, लंच किंवा डिनर डेटसाठी काही वेळ काढणे …या काळात तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल खास भावना निर्माण होतात. आपल्यापैकी कदाचित सर्वांनीच याचा अनुभव कधी ना कधी घेतला असेल. पण आता काळ बदलला आहे. एखाद्याला डेट करणे किंवा त्याच्यासह वेळ घालवणे इतकी सोपी गोष्ट राहिली नाही. ऑनलाईन डेटिंगपासून ब्लाइंड डेट्सवर जाण्यासाठी आज नातं फार वेगळं आहे. यापूर्वी लोक डेटिंगबद्दल चर्चा करत असते पण आता ब्रेकअपबाबतही बोलततात. आजच्या घडीला जितकं डेटिंग करणे समान्य गोष्ट आहे तितकंच बेक अप देखील आहे. सध्या ब्रेकअप संबधीत एक शब्द सोशल मिडियावर व्हायरल होत आहे तो आहे डेलीकेट डपिंग (Delicate Dumping). पण प्रश्न असा आहे की हे डेलिकेट डंपिग काय आहे. चला जाणून घेऊ या..

जर तुम्हाला डंपिग या शब्दाचा थोडासा अंदाज असेल तर तुम्हाला या शब्दाचा अर्थ लगेच लक्षात येइल . जेव्हा नात्यामध्ये एखादी व्यक्ती त्याच्या पार्टनरला सोडून देते किंवा त्याच्याशी ब्रेकअप करते तेव्हा त्याला डंपिग असे म्हटले जाते. पण यासाठी जोडीदार एकमेकांचा सामाना करतात आणि कित्येकदा परस्पर सांमजस्याने किंवा भांडून एकमेकांच्या चूका दाखवत कायमचे वेगळे होतात. तुम्हाला असे ब्रेकअपबाबत माहित असेल पण डेलिकेट डंपिग थोडं वेगळं आहे.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Ajit Pawar, seat allocation
“जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

काय आहे डेलिकेट डंपिंग?

डेलिकेट डंपिग नात्यामधील अशी स्थिती आहे जिथे एक व्यक्ती आपलं नातं टिकविण्यासाठी प्रयत्न करणे बंद करतो जेणेकरून दुसऱ्या जोडीदाराला त्याची जाणीव होऊ शकते ज्यामध्ये हे नातं पुढे नेण्यात त्यांना फार स्वारस्य नाही. हे ऐकायला फार असंवेदनशील वाटते पण रिलेशिनशिप एक्सपर्ट लोकांना याबाबत जागरुक राहण्याचे आवाहन करते आहे.

हेही वाचा – तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात का? नात्यात या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करु नका

डेलिकेट डंपिंग म्हणजे स्वत:ला दोषी न ठरवता नातं तोडण्याची नवी पद्धत!

या ट्रेंडबद्दल बोलताना एम्मा हॅथॉर्न या डेटिंग एक्सपर्टने Metro.co.uk ला सांगितले: ”जेव्हा एखाद्या पुरुषाला वाद, भांडणे, भूतकाळाची आठवण करून देणे किंवा आपल्या जोडीदाराने विचारलेल्या प्रश्नांपासून दूर राहायचे असते तेव्हा डेलिकेट डंपिंग आधार घेतो. डेलिकेट डंपिंग सोप्या भाषेत सांगायचे तर, स्वतःला दोषी न ठरवता एखाद्ं नातं तोड्ण्याची एक पद्धत

डेलिकेट डंपिंग : ब्रेक-अप करण्याचा नवा फंडा!

डेलिकेट डंपिंग म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदारावरील प्रेमात कमी होते पण, आपल्या खऱ्या भावना व्यक्त करत नाही. त्याऐवजी, नातेसंबंधातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात तो नातं जपणं थांबवतो. तो त्यांचं नात टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीलाच नाते संपवायला भाग पाडले जाते.

हेही वाचा – पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे काय? त्याचा नात्यावर होणारा परिणाम जाणून घ्या

एक्सपर्टने दिला सावधानतेचा इशारा

इंडियन एक्स्प्रेसने कोलकातास्थित क्लिनिकल सायकोलॉजिस्ट शिंजिन देब यांच्याशी या प्रकरणाबाबत चर्चा केली. ते म्हणतात की, डेलिकेट डंपिंगचा परिणाम एका नाण्याच्या दोन बाजूंसारखा असतो. ‘एक जोडीदार ज्याने नातेसंबंधात प्रयत्न करणे थांबवले आहे तो शेवटी दुसर्‍यावर चिडचिड करतो आणि अनेकदा भावनिकरित्या माघार घेतो. दुसरीकडे, त्याला आशा आहे की, असे केल्याने, समोरची व्यक्ती स्वतःच त्याला सोडून जाईल आणि त्याचे काम सोपे होईल.