Women’s Day 2024: दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. या वेळी ८ मार्चला या निमित्ताने अनेक ट्रॅव्हल कंपन्या महिलांसाठी खास ऑफर्स घेऊन आल्या आहेत, ज्या खूपच आकर्षक वाटतात. ज्या महिलांना प्रवासाची आवड आहे त्यांना हे खूप आवडेल, परंतु तुम्हाला माहित आहे का की या प्रकारच्या प्रवास योजनेचे फायदे तर आहेतच पण त्याचे काही छुपे तोटेही आहेत. त्यामुळे, ट्रॅव्हल स्कीम मार्केटमधील कोणत्याही ऑफरचा विचार करण्यापूर्वी, तुम्हाला तज्ञांच्या टिप्स घेणे आवश्यक आहे. ट्रॅव्हल स्कीम घेण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे ते जाणुन घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

‘हॉलिडे नाऊ, पे लॅटर’ स्कीम म्हणजे काय? (What is Holiday Now Pay Later)

‘हॉलिडे नाऊ, पे लॅटर’ योजनेमध्ये, ट्रॅव्हल कंपनी प्रथम सुट्टीचा आनंद घेण्याची संधी देते आणि नंतर फी भरण्याचा पर्याय देते. ही ऑफर ऐकायला खूपच मजेदार आणि आकर्षक दिसते आणि वाटते, परंतु फार कमी लोकांना हे माहित आहे की, या योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज हे असुरक्षित कर्ज मानले जाते. या कर्जाचे वार्षिक व्याजदर २० ते ३० टक्क्यांपर्यंत आहेत, जे खूप जास्त आहे. म्हणजेच, जर तुम्ही या योजनेअंतर्गत पहिल्यांदा मोफत सुट्टीचा आनंद लुटला, तर तुम्हाला वर्षभर खूप जास्त व्याजदराने पैसे द्यावे लागतील आणि ते सामान्य प्रवासापेक्षा खूप महाग असेल.

Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

‘हॉलिडे नाऊ, पे लॅटर’ साठी काय करावे लागेल
तुमचा क्रेडिट स्कोअर उत्कृष्ट असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
तुम्हाला एकूण प्रवास खर्चाच्या १५-२० टक्के भरावे लागतील. उर्वरित रक्कम सुट्टीवरून परतल्यानंतर भरावी लागणार आहे.
तुम्ही उर्वरित रक्कम एकत्र भरल्यास, तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही परंतु EMI मध्ये पेमेंट करण्यासाठी व्याज द्यावे लागेल.
सुट्टीवरून परतल्यानंतर युजरला फायनान्स कंपनीला पेमेंट करावे लागेल.
जर त्यांनी एकरकमी शुल्क भरले तर कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही आणि जर वापरकर्त्याने EMI पर्याय निवडला तर त्याला व्याज देखील द्यावे लागेल.

काय खबरदारी घ्यावी?
आता अशा ऑफर्सचे काय करावे याबद्दल बोलूया. तज्ञांचे म्हणणे आहे कीस जर तुम्हाला ऑफर चांगली वाटत असेल तर ती निवडू नका परंतु टूर फी, ईएमआय दर आणि व्याजदर याबद्दल दोनदा विचार करा. टूरसाठी तुमच्या बचतीतून एकरकमी पैसे देण्याचा प्रयत्न करा, व्याजदरासह EMI पर्याय तुम्हाला महागात पडू शकतो.