|| दर्शना गावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली अनेक लोक योगाकडे आकर्षित होताना दिसतात. फिटनेस कार्यक्रम या दृष्टीने योगाकडे पाहण्याची वृत्ती दिसते. वास्तविक योगाची उच्चतम तत्वे आणि धेय्ये ध्यानात घेतले तर केवळ व्याधी निवारण हा योगाचा उद्देश नाही. त्याच बरोबर योग म्हणजे योगासने हा सार्वत्रिक गैरसमज देखील किती चुकीच्या धारणावर आधारित आहे हे देखील स्पष्ट होते. योग परंपरा जितकी जुनी आहे तितकाच त्याचा अभ्यास पसारा देखील मोठा आहे. त्यामुळे योग म्हणजे नक्की काय हे थोडक्यात जाणून घेऊयात.

मुळात योग हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. एकंदरीतच शरीर व मनाला एकत्रित जोडणे म्हणजेच योग. यात व्यक्तिगत साधनेला खूप महत्त्व आहे. चर्चा,मसलती सर्व टाळून गुरूने उपदेशलेल्या मार्गाने पुढे जात राहणे हा योग अभ्यासाचा महत्वाचा नियम आहे. योगाचे विविध प्रकार फार पूर्वी पासून प्रचलीत आहेत. त्यामध्ये मंत्र योग, ध्यान योग, भक्ती योग, कर्म योग त्याच प्रमाणे जास्तीत जास्त हठयोगाचे प्रसारण झालेले दिसते. हठयोग म्हणजे संपूर्ण शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरण. हठयोगाचा एक वेगळा शारीरिक  अर्थ असा सांगितला जातो की ‘ह’ म्हणजे उजव्या नासिकेतून होणार आणि ‘ठ’ म्हणजे डाव्या नासिकेतून होणार श्वासोच्छवास होय. यांना अनुक्रमे सूर्य नासिका आणि चंद्र नासिका असे म्हणतात. या दोन्ही नासिकांचे ऐक्य साधून आणायचे असते. व ते कष्ट साध्य असते त्यामुळेच याला हठयोग असे म्हणतात.

या मध्ये गायत्री मंत्राचा देखील समावेश आहे. गायत्री मंत्र २४अक्षरांमध्ये बांधला गेलेला असून त्या संपूर्ण २४ अक्षरांचे आप-आपले वेगळे असे महत्व आहे. गायत्री मंत्राच्या उच्चरणाने ध्वनि निर्माण होऊन शरीरात कंपन तयार होतात.  याचे अध्यात्मिक महत्व देखील बरेच सांगितले जाते. पण त्या पलीकडे जाऊन गायत्री  मंत्राने आपल्याला स्थिर होण्यास मदत होते. त्याचबरोबर वाणी शुद्ध होते. व शब्दउच्चर देखील स्पष्ट होतात.

योग हे अष्टांगयोग वर आधारलेले आहे. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायम,प्रत्याहार, धारणा, ध्यान,समाधी यांचा अभ्यास केला जातो. यामधील प्रत्येक अंगाला हे अनन्य साधारण असे महत्व जरी आसले, तरी मानवाला सामान्य जीवन जगताना अतिशय उपयोगी असणारे अंग म्हणजे १) यम,२) नियम…. यम म्हणजे सामाजिक स्वास्थ्यासाठी निर्माण केलेली अशी तत्वे की ज्यामुळे समाजाचे स्वास्थ्य नीट राहू शकते. तर नियम म्हणजे स्वतःच्या स्वास्थ्यासाठी असलेले काही नियम व यामधील पुढील पायरी म्हणजे आसन.

ताण-तणावामुळे मांस पेशी कडक होतात. स्नायू व्यवस्थित कार्य करत नाहीत. यामुळे शरीराची लवचिकता देखील नाहीशी होते. ही लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी आसन करणे गरजेचे आहे. तसेच आसनांचे फायदे पुढील प्रमाणे- मानावर नियंत्रण मिळवणे शक्य होते, रक्त संचालन व्यवस्थित शरीरभर होते, थकवा येत नाही, श्वासावर नियंत्रण येते, शरीर लवचिक बनते, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अनावश्यक विजातीत बाहेर फेकण्यास मदत होते. त्यामुळे पचन संस्थेचे विकार नाहीसे होतात.

आजच्या धकाधकीच्या लाईफ स्टाईल वर कॅट्रोल मिळवायचा असेल तर योग साठी वेळ देणे आवश्यकच आहे. योग आपल्या जीवनातील सर्व नस-नाड्याचे शुद्धीकरण करतो. शरीर स्वस्थ ठेवण्यास मदत तसेच तण तणावासंबंधी हार्मोन्स ला नियंत्रित करण्यात देखील मदत करतो. तणाव आणि मानसिक रोग या सारखे आजार दूर करण्यासाठी योग हा उत्तम उपाय म्हणता येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा ही घोषणा केल्यापासून बऱ्याच शाळांमध्ये देखील योग शिवण्यास सुरुवात झालेली दिसते. तसेच समाजातील काही संस्था देखील योगासन स्पर्धेचं आयोजन करताना दिसतात. अनेक शाळांमध्ये योगासन स्पर्धेत सहभागी झाल्याचं प्रमाणपत्र दाखवलयास त्या विद्यार्थ्यास परीक्षेत वाढीव गुण दिले जातात. हा एक स्तुत्य उपक्रम म्हणायला काही हरकत नाही कारण गुणांच्या आकर्षणामुळे का होईना विद्यार्थी विद्यार्थी व पालक योग कडे वळताना दिसतात.

हल्ली बऱ्याच जणांचे असे देखील मत असते की, दिवसभराच्या धावपळीत योग करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्या मुळे वेळ कमी असेल तर निदान श्वसन संस्था कार्यक्षम बनवण्यासाठी कपालभाती चे प्रकार तसेच पचन संस्थेसाठी काही मुद्रा म्हणजेच अग्निसार, नमनमुद्रा, ऊड्डीयान व यानंतर सूर्यनमस्कार व इतर  काही व्याधींनृप आसने केल्याने देखील आपले स्वास्थ्य सुदृढ राहण्यास मदत होते. परंतु जर योग साधनेतून जास्त लाभ हवा असेल तर सुरुवात मंत्र उच्चरणाने केलेली उत्तम. त्याच प्रमाणे योग साधनेस सुरुवात करताना योग्य मार्गदर्शकाच्या सल्ल्यानेच करावी.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is yoga how does it work
First published on: 12-08-2018 at 00:03 IST