Eating Saunf Benefits: चांगल्या आरोग्यासाठी आणि रात्री शांत झोपेसाठी रात्रीचा हलका आहार घेण्याची शिफारस तज्ज्ञ नेहमीच करतात. याशिवाय रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ फिरायला (वॉक) जाणं आणि झोपण्याच्या वेळेत किमान तीन तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. हल्ली अनेकांना ही गोष्ट मान्य आहे, परंतु जेवणानंतर आपण शेवटची गोष्ट कोणती खावी हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत आज आम्ही सांगणार आहोत.

रात्रीच्या जेवणानंतर काय खावं?

अनेकांना रात्रीच्या जेवणानंतर गरम दूध पिणे, नट्स खायला आवडतात. या गोष्टी खाल्ल्यानेही आरोग्याला फायदा होतो, परंतु अधिक फायद्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर बडीशेप खाऊ शकता. ही एक सवय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

(फोटो सौजन्य: Freepik)

झोपण्यापूर्वी बडीशेप का खावी?

रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येचा त्रास होतो, ज्याचा परिणाम झोपेवर होतो. पोट व्यवस्थित नसल्यामुळे व्यक्तीला झोपायला त्रास होतो. अशा परिस्थितीत बडीशेप खाणे फायदेशीर ठरू शकते. बडीशेप खाल्ल्याने गॅस्ट्रिक एंजाइम तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे पचनक्रिया बळकट होते, यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. तसेच बडीशेप मेलाटोनिनसारख्या झोपेला प्रोत्साहन देणारे हार्मोन्स तयार करण्यातदेखील मदत करते, ज्यामुळे तुम्हाला लवकर आणि चांगली झोप लागण्यास मदत होते; अशा स्थितीत रात्री बडीशेप खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

बडीशेपमुळे तणाव, चिंता कमी होते

तुम्ही रात्री तणावामुळे त्रस्त असाल तर बडीशेपचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बडीशेपमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म तसेच नैसर्गिक फायटोकेमिकल्स असतात, जे तणाव दूर करण्यास मदत करतात. हे शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्हाला आराम मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिटॉक्सिफिकेशन

रात्रीच्या वेळी बडीशेपचे सेवन केल्याने शरीर विषमुक्त होण्यास मदत होते. लहान दिसणाऱ्या या बियांमध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे गुणधर्म असतात. शरीरातील हे डिटॉक्सिफिकेशन केवळ आपले आरोग्य चांगले ठेवत नाही तर आपल्या त्वचेर देखील चांगले परिणाम करते. बडीशेपमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.