Healthy Deep Frying Oils : भजी, पुरी, फ्रेंच फ्राईज आणि तळलेले चिकन असे अनेक पदार्थ सर्वांनाच खायला आवडतात. हे पदार्थ चवीला चविष्ट असले तरी, त्यांचे काही तोटेही आहेत. या कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने आणि अनहेल्दी फॅट्स (अस्वास्थ्यकर चरबी)मुळे, हे पदार्थ रोजच्या सेवनासाठी योग्य नाहीत. इतकेच नाही तर हे पदार्थ तळताना आपण नक्की कोणते तेल वापरतो याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे…
तळलेले पदार्थ टाळण्याची शिफारस केली जात असली तरी, अधूनमधून खाल्ल्याने नुकसान होणार नाही. फक्त तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या योग्य तेलांबद्दल माहिती करून घेणे गरजेचे आहे. तर याबद्दल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी आणि पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर म्हणतात की, योग्य तेल वापरून तुम्ही तुमचे अन्न अधिक सुरक्षितपणे तळू शकता. डॉक्टरांनी दिलेल्या तेलाच्या नावांची यादी दिली आहे ती पुढीलप्रमाणे…
तूप (Ghee)
तूपाचा स्मोकिंग पॉईंट (smoke point) साधारणपणे ४५० °F (२३२ °C) असतो. (Smoke point म्हणजे एखादे तेल किंवा तूप गरम करताना जेव्हा त्यातून धूर निघायला लागतो ते तापमान). यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, पचनसंस्थेला देखील मदत होते आणि तुमची सज्ञात्मक क्षमता सुधारते.
नारळा तेल (coconut oil)
नारळाच्या तेलाचा स्मोकिंग पॉईंट ४०० °F (२०४ °C) असतो. त्यामुळे डीप फ्रायसाठी हा एक चांगला पर्याय आहे. नारळाच्या तेलात मध्यम-साखळीतील फॅटी ॲसिड जसे की, लॉरिक ॲसिड देखील असते, ज्याचे अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी फायदे देतात.
रिफाइंड ऑलिव्ह ऑईल (Refined olive oil)
रिफाइंड ऑलिव्ह ऑईलचा स्मोकिंग पॉईंट सुमारे ४६५ °F (२४० °C) असतो. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील भरपूर असतात आणि हृदयासाठी निरोगी ठरतात.
अॅव्होकॅडो तेल (Avocado oil)
अॅव्होकॅडो तेलाचा सुमारे ५२० °F (२४० °C) असतो ; जो डीप फ्राय अन्न शिजवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अॅव्होकॅडो तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स देखील भरपूर असतात.
डीप फ्रायसाठी इतर तेल (Other oils for deep frying)
तांदळाचा भुसाच्या तेलात आणि शेंगदाण्याच्या तेलात देखील स्मोकिंग पॉईंट जास्त असतो; त्यामुळे डीप फ्राय करण्यासाठी योग्य आहेत. असे तेल तुलनेने स्वस्त मिळतात आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.