लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाचं वृत्त आहे. WhatsApp ने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. जे युजर्स व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी स्वीकारणार नाहीत त्यांना WhatsApp अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. म्हणजेच WhatsApp चा वापर करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अटी स्वीकारणं अनिवार्य असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यातच व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे सर्व अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने नव्या पॉलिसीबाबतची माहिती दिली होती. आता युजर्सना WhatsApp ची नवीन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत स्वीकारावी लागेल. जर एखाद्या युजरने नवीन पॉलिसी स्वीकारली नाही तर त्याला WhatsApp अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. युजरने WhatsApp ओपन केल्यानंतर स्क्रीनवर नवीन पॉलिसी दिसेल, ही पॉलिसी स्वीकारण्यासाठी तुम्हाला Accept Now पर्यायावर क्लिक करावं लागेल. थोड्या कालावधीसाठी पॉलिसी स्वीकारायच्या नसल्यास तुम्ही ‘नॉट नाउ’ या पर्यायावरही क्लिक करु शकतात. पण या पॉलिसी स्वीकारण्यास नकार दिल्यास तुम्हाल व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट वापरता येणार नाही.

काय आहे नवी पॉलिसी? 
व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींमध्ये नववर्षात युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, युजर्सचा चॅटिंग डेटा कशाप्रकारे स्टोअर आणि मॅनेज केला जातो, याशिवाय फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल याबाबतही माहिती देण्यात आली आहे. नव्या पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं जास्त इंटीग्रेशन आहे. म्हणजे आता युजर्सचा आधीपेक्षा जास्त डेटा फेसबुककडे जाईल. व्हॉट्सअॅपचा डेटा आधीपासूनच फेसबुकला दिला जातो. पण आता फेसबुक आणि इस्टाग्रामवर इंटीग्रेशन जास्त होईल असं कंपनीने स्पष्ट केलंय.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp updates terms of service privacy policy accept it or your account will be deleted sas
First published on: 06-01-2021 at 12:15 IST