कोलेस्ट्रॉल हा एक चिकट पदार्थ आहे जो पेशींच्या भिंती, मज्जासंस्थेचा संरक्षणात्मक स्तर आणि हार्मोन्स तयार करण्यात मदत करतो. जर कोलेस्ट्रॉल प्रथिनांमध्ये मिसळले तर लिपोप्रोटीन बनते. आपल्या शरीरात २ प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळतात, जे चांगले आणि वाईट या श्रेणीत मोडतात. त्याला अनुक्रमे एचडीएल आणि एलडीएल असे म्हणतात.

शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. आज आपण शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून कसे थांबवायचे ते जाणून घेऊया. तसेच, अशावेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे हे समजून घेऊया.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

या गोष्टींच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलवर मिळवता येते नियंत्रित

  • ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक प्रकारचे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. ते वजन कमी करणारे पेय म्हणूनही ओळखले जाते. जर तुम्ही दररोज ग्रीन टी प्याल तर कोलेस्ट्रॉल लक्षणीय प्रमाणात कमी होईल.

  • फ्लेक्ससीड/अळशी

अळशीच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या बियांच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. सलाड आणि ओट्समध्ये मिसळून तुम्ही ते खाऊ शकता.

  • मासे

माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी होतात आणि रक्तप्रवाहात अडथळा येत नाही. याच कारणामुळे माशांच्या सेवनाने खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते.

फ्लश करताना टॉयलेट सीटचे झाकण बंद ठेवावे की उघडे? संशोधनातून समोर आली माहिती

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर या गोष्टी टाळा

  • तेलकट पदार्थ

भारतात शिजवलेले बहुतेक अन्न तेलकट असते आणि बाजारात मिळणारे जंक फूड कोलेस्टेरॉलची पातळी अनेक पटींनी वाढवते.

  • दुग्धजन्य पदार्थ

दुधाला संपूर्ण अन्न म्हटले जाते कारण त्यामध्ये बहुतेक पोषक तत्व असतात परंतु जास्त चरबीयुक्त दूध आणि चीजपासून दूर राहणे चांगले.

  • मांस

मांस खाल्ल्याने शरीराला प्रथिने मिळतात यात शंका नाही, पण याच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी लक्षणीय वाढते, जे नंतर हृदयविकाराचे कारण बनते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)