अमेरिकेत या ठिकणी मिळेल लक्झरी राहणीमान

तुम्हाला सुट्टीला बाहेर जायचं असेल तर डिंगी तंबू, धूळ भरलेल्या स्लीपिंग बॅग्स, पोर्टेबल स्टोव्ह आणि फ्रीजमध्ये सुकवलेली स्पॅगेटी असायलाच पाहिजे असे नाही.

तुम्हाला सुट्टीला बाहेर जायचं असेल तर डिंगी तंबू, धूळ भरलेल्या स्लीपिंग बॅग्स, पोर्टेबल स्टोव्ह आणि फ्रीजमध्ये सुकवलेली स्पॅगेटी असायलाच पाहिजे असे नाही. त्याऐवजी, तुम्ही इजिप्शियन कॉटन शीट्स, फाइव्ह स्टार ब्रेकफास्ट आणि कॉन्सिएर्ज सेवा न सोडता अमेरिकेच्या अविस्मरणीय नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. कठीण स्थितीत राहणं तुम्हाला आवडत नसेल आणि तरीही तुम्हाला ताजी हवा हवी असेल तर यातील काही आलीशान हॉटेल्समध्ये बुकिंग करा, जी अमेरिकेतल्या सर्वांत देखण्या लँडस्केप्समध्ये आहेत.

मॅजेस्टिक योसेमाइट हॉटेल, कॅलिफोर्निया
कॅलिफोर्नियातील योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये असलेले हे ऐतिहासिक स्थान तुम्हाला पार्कच्या सौंदर्याचा आनंद जागतिक दर्जाच्या सेवेसह घेण्याची संधी देते. १९२७ साली उद्घाटन झालेले मॅजेस्टिक योसेमाइट हॉटेलच्या आर्किटेक्चरल घटक आणि डेकोरमध्ये तुम्हाला पार्कचे टोकदार सुळके, धो-धो वाहणारे धबधबे आणि सुंदर झाडांचा आनंद घेता येईल. भलेमोठे प्रवेशद्वार, लाकडी स्लॅब दरवाजे आणि फ्लोअर ते सीलिंग खिडक्या तुम्हाला ओळखीच्या वाटतील, कारण स्टॅनली कुब्रिकच्या ख्यातनाम हॉरर चित्रपट दि शायनिंगच्या काही दृश्यांचे चित्रिकरण येथे कऱण्यात आले होते. दरम्यान, यातील मोठ्या डायनिंग रूममध्ये कॉर्नर अल्कोव्ह खिडकीतून योसेमाइट फॉल्सचे सुंदर दृश्य दिसते. हे हॉटेल केंद्रस्थानी स्थित आहे. त्यात हायकिंग ट्रेल्स, योसेमाइट फॉल्स आणि इतर बाहेरच्या उपक्रमांचा आनंद अगदी दाराबाहेर लगेच घेता येतो. हॉटेलमधील कर्मचारी पार्क तसेच घोड्यावरील राईड आणि उतर उपक्रमांसाठी टूर्सचे आयोजन करू शकतात.

लेक प्लेसिड लॉज, न्यूयॉर्क
न्यूयॉर्कच्या अदिरोन्डाक प्रदेशात असलेल्या सुंदर तलावावर असलेले लेक प्लेसिड लॉज आपल्याला ऐषाराम देतात आणि तोही त्या विभागाच्या हायकिंग ट्रेल्स व स्की स्लोप्सवर आहे. ही पॉश लेकफ्रंट रिसॉर्टची स्टाइल त्याच्या आजुबाजूच्या परिसराचे प्रतिबिंब उमटवते. त्यात दगडी फायरप्लेसेस, फीदरबेड्स, स्थानिक लोकांनी बनवलेले लाकडी फर्निचर आणि आकर्षक तलाव व डोंगरांची दृश्ये जवळपास प्रत्येक खोलीतून दिसतात. तुम्ही इथे असता, तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची मदत हिवाळ्यात स्नोशूईंग, आइस स्केटिंग, स्किइंग आणि स्लेडिंगसाठी तर उन्हाळा, वसंत व शरद ऋतूत बोटिंग, पोहणे, मासेमारी, हायकिंग आणि टेनिस यांच्यासाठी घ्या.

अमनगनी व्योमिंग
ईस्ट ग्रोस व्हेंटर बट या जॅकसन होल, व्योमिंगमध्ये असलेले हे खास अमनगनी रिसॉर्ट आपल्याला बर्फाच्छादित ग्रँड टेटॉन डोंगररांगांची अविस्मरणीय दृश्ये पाहण्याचा आनंद देते. या ठिकाणची सूट्स अगदी वरपासून खालपर्यंत खिडक्यांनी बनवलेली असून डोंगराळ दृश्यांचा आनंद आपल्याला इथे मिळतो. अमनगनीकडे हिवाळ्यात पाहुण्यांसाठी एक खासगी स्कि स्लोप आहे आणि कॉन्सिएर्जकडून तुम्हाला वसंत आणि उन्हाळ्यात स्नेक रिव्हरमध्ये कॅनोईंग, कयाकिंग व फिशिंगसाठी बुकिंग मिळू शकेल.

स्टेन एरिकसेन लॉज, ऊटा
पार्क सिटीभोवती असलेल्या डोंगररांगांमध्ये स्थित ऊटा हे एक लोकप्रिय स्कि लोकेशन स्कॅन्डिनेव्हियन इन्स्पायर्ड स्टीन एरिक्सन लॉज आहे. अल्पाइन सेटिंग, रस्टिक डेकोर व डोंगररांगा पाहुण्यांना आकर्षित करतात आणि त्याचबरोबर उत्तम सेवा, आलीशान खोल्या व डीयर व्हॅली रिसॉर्टच्या स्लोपवर स्कि इन आणि स्कि आऊट एक्सेस यांच्यामुळे स्टेन एरिकसन लॉजचे नाव २०१४ मध्ये सर्वोत्तम स्कि हॉटेल म्हणून वर्ल्ड स्कि अ‍ॅवॉर्ड्समध्ये देण्यात आले. उन्हाळ्यात, प्रसिद्ध स्कि रन्सचे रूपांतर हायकिंग व माऊंटन बायकिंग ट्रेल्समध्ये करण्यात आले आहे आणि जवळपास असलेले पाच गोल्फ कोर्सेस पाहुण्यांना सेवा देऊन स्टेन एरिक्सन लॉजला आऊटडोअरप्रेमींना वर्षभर अत्यंत लोकप्रिय बनवतात.

एन्चान्टमेंट रिसॉर्ट आणि स्पा एरिझोना
सेदोनाच्या खास लाल रॉक क्लिफने आच्छादित एरिझोनामध्ये लक्झ एन्चान्टमेंट रिसॉर्ट आणि स्पा आहे. या रिसॉर्टची एडोब स्टाइलची वास्तुरचना त्याच्या आसपासच्या परिसराशी जोडली जाते आणि प्रत्येक खोलीला रेड कॅनयॉन वॉल्स आणि हिरव्या कॉटनवूड झाडांचे दृश्य आहे. या ठिकाणच्या २८ हेक्टरमधील सुंदर सेवा असलेली मि अमो स्पा ही १६ कॅसिटा स्पा रूम्सनी व प्रादेशिक खाद्यपदार्थांनी युक्त रेस्टॉरंट्सह आहे. मि अमो स्पामध्ये डेझर्ट इन्स्पायर्ड ट्रीटमेंटचा आनंद येथे लोकांना घेता येईल. हा देशातील सर्वोच्च स्पापैकी एक मानला जातो. तुम्हाला आणखी साहस हवे असेल, तर रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांना पश्चिम कॅनयॉन्सवर घोड्यावरून स्वारी किंवा वेर्दे रिव्हर व्हॅलीमध्ये राफ्टिंग ट्रिपचे आयोजन करण्यास सांगा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Where to find luxury in the us