Foods That Spike Blood Sugar : हाय ब्लड शुगर ही अशी स्थिती आहे; जी तुमच्या रक्तात खूप जास्त साखर आहे, असे दर्शवते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सामान्यतः रक्तातील साखरेची पातळी जास्त असते. कारण- त्यांचे शरीर आवश्यक इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीराद्वारे तयार होणारे इन्सुलिन प्रभावीपणे वापरले जात नाही. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी योग्यरीत्या व्यवस्थापित केली जात नाही, तेव्हा तुमच्या एकूण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हृदयरोग, मूत्रपिंडाचे आजार, रेटिनोपॅथी व न्यूरोपॅथी इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करणारा एक प्रमुख घटक म्हणजे तुमचा आहार. तुम्ही जे अन्न खाता, ते तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर थेट परिणाम करतात. त्यामुळे तुम्ही काय खाल्लं पाहिजे याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. सगळ्यात पहिली बाब म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे पदार्थ तुम्ही खाऊ नये. पण, कधी कधी नकळत तुम्ही हेच पदार्थ खाता आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. तर आज आपण नेमके हे पदार्थ कोणते त्याबद्दल बातमीतून जाणून घेणार आहोत.

ग्रॅनोला आणि ग्रॅनोला बार

हे आरोग्यदायी पदार्थ म्हणून विकले जात असले तरी ग्रॅनोला आणि ग्रॅनोला बारमध्ये रिफाइंड कार्ब्स, सिरप व सुका मेवा असू शकतात, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असतो. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेमध्ये झटपट वाढ होते.

फ्लेवर्ड योगर्ट

साधा दही आरोग्यदायी असला तरी फ्लेवर्ड (म्हणजे फळांचा स्वाद, साखर, कलर, आणि कृत्रिम चव असणारे दही) दह्यामध्ये जवळजवळ २० ग्रॅमपर्यंत साखरेचा समावेश असतो. जर तुम्ही रिकाम्या पोटी दह्याचे सेवन केले, तर ही साखर तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढवू शकते.

फळांचा रस

१०० टक्के नैसर्गिक फळांच्या रसातही फायबरची कमतरता असते. त्यामुळे साखरेचे जलद शोषण होते. संत्र्याचा रस प्यायल्यानंतर लगेचच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

संपूर्ण धान्याचा ब्रेड

पांढऱ्या ब्रेडपेक्षा संपूर्ण धान्याचा ब्रेड (ब्राऊन ब्रेड) चांगला असला तरी ब्रँड आणि प्रक्रिया यांनुसार संपूर्ण धान्याच्या ब्रेडमध्ये ग्लायसेमिक भार जास्त असू शकतो. काही संपूर्ण धान्याच्या ब्रेडमध्ये साखरदेखील असते; ज्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढू शकते.

इन्स्टंट ओटमील

जरी ओट्स आरोग्यदायी असले तरी, इन्स्टंट ओटमिल हे खूप प्रक्रिया केलेले असते आणि त्यात साखर, मीठ असू शकते. त्यामुळे कमी फायबरचे प्रमाण ते लवकर पचवते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

सुका मेवा

मनुके, खजूर यांसारख्या सुक्या मेव्यामध्ये नैसर्गिक साखरेचे केंद्रित स्रोत आहेत. त्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने, साखरेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरसुद्धा वाढते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉफी

कॉफी रक्तातील साखरेची पातळी वाढवत नसली तरी फ्लेवर्ड लॅट्स, आइस्ड कॉफी व फ्रॅप्समध्ये सिरप, व्हीप्ड क्रीम व शुगरी मिल्क असते; ज्यामुळे रक्तातील साखरसुद्धा वाढते.