Dry Fruits For Uric Acid : युरिक अ‍ॅसिड शरीरात तयार होणारे एक असे टॉक्सिन आहे, जे प्रत्येक अवयवावर मारा करू शकते. युरिक अ‍ॅसिडचा मुख्य हल्ला हा किडनीवर होतो. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याने युरिक अ‍ॅसिड वाढून शरीरात लहान क्रिस्टलसारखे खडे जमा होऊ लागतात. हे खडे किडनीमध्ये जमा झाल्यास किडनी स्टोनचा आजार होतो. युरिक अ‍ॅसिड सांध्यांमध्ये स्थिर होऊन संधिवात होऊ शकतो, यात शरीराला अत्यंत तीव्र वेदना होऊ शकतात; तर युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे मुख्य कारण हे प्युरीन युक्त पदार्थांचे सेवन करणे आहे. सहसा पचनास जड असे मांस व मद्य हे प्युरीनचा साठा असणारे पदार्थ म्हणून ओळखले जातात.

डॉक्टर सहसा अशी औषधे लिहून देतात, जी युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतात. पण, गोळ्या खाऊन आपल्यातील अनेकांना कंटाळा येतो, तर यासाठी काही ड्रायफ्रूटदेखील आहेत; जे तुम्हाला मदत करू शकतात. हे ड्रायफ्रूट तुमच्या सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

युरिक अ‍ॅसिड कमी करणारे ड्रायफ्रूट्स (Dry fruits to lower uric acid)

बदाम – बदामामध्ये मॅग्नेशियम आणि वनस्पती-आधारित प्रथिने असतात, जे सांध्यातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. बदामांमध्ये प्युरिनचे प्रमाणदेखील कमी असते, जे जास्त युरिक अ‍ॅसिड पातळी असलेल्या लोकांसाठी सुरक्षित ठरते; त्यामुळे हाडांची ताकद सुधारण्यासाठी तुम्ही बदाम खाऊ शकता.

अक्रोड – अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे सांध्यातील कडकपणा आणि सूज कमी करण्यास मदत करतात. तसेच, त्यात प्युरिनचे प्रमाण कमी असल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन होणार नाही.

पिस्ता – पिस्तामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी६ असते, जे सांध्यांचे आरोग्य सुधारू शकतात, यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारून युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतात; जे शरीरातील अतिरिक्त युरिक अ‍ॅसिड बाहेर काढण्यासाठी आवश्यक असतात.

काजू – काजूमध्ये निरोगी चरबी आणि मॅग्नेशियम आणि झिंकसारखी खनिजे असतात, जे सांध्याची लवचिकता सुधारतात. काजूमध्ये मध्यम प्रमाणात प्युरीनचे प्रमाण असते, त्यामुळे जळजळ कमी करून युरिक अ‍ॅसिडच्या चयापचयात मदत करू शकतात.

खजूर – खजूर नैसर्गिकरित्या गोड असतात आणि पोटॅशियमने समृद्ध असतात; जे इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास आणि युरिक अ‍ॅसिड जमा न होऊ देण्यासाठी मदत करतात. त्यातील अँटीऑक्सिडंट घटक सांध्यांच्या उतींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासूनदेखील संरक्षण देतात.