scorecardresearch

समोरच्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही का येते जांभई? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

खाद्याला जांभई देताना पाहून दुसऱ्याला आपोआप जांभई येऊ लागते. यामागे अनेक रंजक वैज्ञानिक कारणे आहेत.

Why do you get Yawn when you see the person in front giving yawning
यामागे झोप हे एकच कारण नाही. (Photo : Pexels)

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की तुमच्या समोर कोणी जांभई दिली तर आपोआप तुम्हालाही जांभई येऊ लागते. माणसाचे हे विचित्र वागणे आहे. यामागे झोप हे एकच कारण नाही. एखाद्याला जांभई देताना पाहून दुसऱ्याला आपोआप जांभई येऊ लागते. यामागे अनेक रंजक वैज्ञानिक कारणे आहेत.

यावर अनेक वैज्ञानिक संशोधने झाली आहेत. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, मानवी जांभई मेंदूशी संबंधित आहे. जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपला मेंदू गरम होतो. या गरम मेंदूला थंड करण्यासाठी जांभई येते. यामुळे आपल्या शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे हिवाळ्यात जांभई जास्त येते.

Photos : ‘या’ आहेत सर्वात जास्त काळ जगणाऱ्या कुत्र्यांच्या प्रजाती

२००४ मध्ये, म्युनिकच्या मानसोपचार विद्यापीठ हॉस्पिटलने एक संशोधन केले होते. या संशोधनात असे समोर आले आहे की जांभईमुळे संसर्ग पसरतो. यामध्ये सुमारे ३०० लोकांवर संशोधन करण्यात आले. यापैकी ५० टक्के लोक असे होते, ज्यांना इतरांना पाहून जांभई येऊ लागली. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर एखाद्याला जांभई देताना पाहते तेव्हा त्याची मिरर न्यूरॉन सिस्टम सक्रिय होते. हेच त्याला एखाद्याच्या जांभईचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करते. म्हणूनच एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही पाहून जांभई आल्यासारखे वाटू लागते.

‘या’ डाळींचे सेवन Diabetes च्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर; आजच करा आहारात समावेश

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की ज्या लोकांचा मेंदू जास्त काम करतो, त्यांना लांब जांभई येते. यासंबंधीचे संशोधन अ‍ॅनिमल बिहेवियर या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why do you get yawn when you see the person in front giving yawning find out the scientific reason behind this pvp