देशाभरातील अनेक राज्यात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही साथ महाराष्ट्रातील अनेक राज्यामध्येही पसरली आहे. या साथीच्या काही रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) तपासले होते. ज्यामध्ये एंटेरो विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याचा अहवाल संस्थेने आरोग्य विभागाला दिला होता. शिवाय ही साथ घरातील एका व्यक्तीला येताच कुटुंबातील इतरांनादेखील त्याचा संसर्ग होतो. त्यामुळे बचाव म्हणून अनेक लोक काळा चष्मा वापरतात. पण काळा चष्मा वापरल्यामुळे खरंच आय फ्लूपासून आपला बचाव होतो का? आणि या दिवसात लोक मोठ्या प्रमाणात काळा चष्मा का वापरतात? ते जाणून घेऊया.
डोळ्याच्या साथीचे अनेक प्रकार आहेत.
देशभरात डोळ्याची साथ रुग्णांमध्ये वाढ होत आहे, आय फ्लू फक्त संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यात पाहण्यानेच पसरतो असं नाही, तर तो विषाणूजन्य, बॅक्टेरिया, ऍलर्जी, रसायनांच्या संपर्कात आल्याने देखील पसरतो. तुम्ही पाहिले असेल की डोळे आल्यानंतर लोक अनेकदा गडद किंवा काळा चष्मा घालतात. तर आय फ्लू काळा चष्मा घातल्याने बरा होऊ शकतो किंवा डोळ्यांचा फ्लू टाळता येऊ शकतो का? असे प्रश्न अनेकांना पडतात. या प्रश्नाचं उत्तर पुढीलप्रमाणे –
काळा चष्मा का घालतात?
जेव्हा एखादी व्यक्ती आय फ्लूच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे डोळे प्रकाशासाठी संवेदनशील होतात आणि त्याला कमी प्रकाशदेखील खूप तेजस्वी दिसू लागतो. ज्यामुळे त्याच्या डोळ्यांना त्रास होतो, हा त्रास कमी करण्यासाठी डोळे आलेले लोक गडद किंवा काळा चष्मा घालतात.
हेही वाचा- पावसाबरोबर डेंग्यूच्या DENV-2 व्हेरियंटचा वाढला धोका! जाणून घ्या या आजाराची लक्षणे आणि उपचार
काळा चष्मा घातल्यामुळे फ्लू पसरत नाही?
काळा चष्मा घातल्यामुळे फ्लू पसरत नाही, असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण आय फ्लू पसरवण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या वस्तूंना स्पर्श करणे, विषाणू इत्यादी.
डोळ्याची साथ कशी पसरते?
डोळ्याची साथ टॉवेल, संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श केल्याने देखील साथ पसरू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती या दूषित वस्तूंना स्पर्श करते किंवा संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात येते तेव्हा संसर्ग अधिक वेगाने पसरतो.
हेही वाचा- तुमच्या वय व वजनानुसार एका दिवसात किती पाणी प्यायला हवं? धोका टाळायचा तर ‘हा’ सोपा तक्ता पाहा
चष्मा घालण्याचे फायदे –
डोळ्याची साथ आल्यानंतर चष्मा घातल्याने डोळ्यांची खाज होणे कमी होते. शिवाय तुम्ही डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळता, त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होते. डोळ्याच्या फ्लूच्या वेळी चष्मा घातल्याने डोळ्यांना खाज कमी होते आणि तुम्ही डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळता, ज्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होते. चष्मा घातल्याने धुळीचे कण डोळ्यांत जाण्यापासून रोखतात, त्यामुळे खाज येत नाही. संसर्ग अधिक पसरू नये म्हणून खबरदारी घेणे आणि योग्य स्वच्छता ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे.