Reasons You are Always feeling Cold : वातावरणात थोडासा जरी गारवा पसरला, तर काही लोकांना थंडी वाजू लागते. वातावरण्यातील गारव्यामुळे थंडी वाजत असेल तर ठीक. पण, एसी लावल्यावर काही वेळातच अंगावर शहारे येतात, जेवल्यानंतर अचानक शरीर थंडीने कापायला सुरुवात होते. अशी लक्षणे दिसत असली, तर नक्की तुमच्या शरीरात कशाची कमतरता आहे. त्याबद्दल तुम्ही वेळीच जाणून घेतले पाहिजे.
तुम्हाला नेहमी थंडी का वाजते याची काही कारणे पुढीलप्रमाणे…
१. व्हिटॅमिन बी १२ – तंदुरुस्त किंवा निरोगी लाल रक्तपेशींसाठी बी १२ आवश्यक असते. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची पातळी कमी असल्यामुळे अशक्तपणा आणि सतत थंडी जाणवू शकते.
२. वजन कमी असणे – कमी चरबी म्हणजे कमी इन्सुलेशन. त्यामुळे घडते असे की, शरीरात उष्णता जास्त काळ टिकून राहत नाही, ज्यामुळे तुम्हाला थंडी वाजण्याची शक्यता जास्त असते.
३. डिहायड्रेशन – पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. पुरेसे पाणी न प्यायल्याने तुम्हाला थंडी जाणवू शकते.
४. हायपोथायरॉईडीझम – थायरॉईड कमी सक्रिय असल्यामुळे थायरॉईड नीट काम करत नसेल, तर शरीराचे कामकाज चयापचय मंदावते, ज्यामुळे थंडी वाजते आणि पटकन थकवा येतो.
५. रक्ताभिसरण – जर रक्त तुमच्या हाता-पायांपर्यंत पोहोचत नसेल, तर तुम्हाला वारंवार थंडी वाजू शकते.
६. लोह – लोहाच्या कमतरतेमुळे येणारा अशक्तपणा तुमच्या पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात अडथळा निर्माण करतो. त्यामुळे तुम्हाला वारंवार थंडी जाणवते.
तर या सहा कारणांमुळे तुम्हाला वारंवार थंडी जाणवत असते. त्यामुळे तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.