चांगल्या प्रकारचे फॅब्रिक आणि त्याची रंगसंगती हे डेनिमचे मूळ वैशिट्ये आहेत. कोणत्याही जीन्सवर कोणत्याही प्रकारचे शर्ट, टी-शर्ट, जॅकेट सहज मॅच होतात. स्पायकर डेनिमचे कपडे दिसायला ही आकर्षक असतात. तुमच्या डेटल इम्प्रेस करण्यासाठी कपडे अधिक महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे स्टायलिश कपडे असणे त्याच सोबत ते आपल्याला शोभून दिसणे खूप महत्वाचे असते. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत डेटवर जाणार आहेत त्याचा/ तिच्या स्वभावाचा, फॅशनचा अंदाज घेऊन तुम्ही त्याला/तिला आवडेल असे कपडे घालू शकता. आणि त्यासाठी अनेक पर्याय डेनिम कपड्यांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे डेनिम कपडे हे डेटवर जाण्यासाठी का महत्वाचे आणि सर्वोत्तम आहेत याची काही करणे पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. कारण यामध्ये असंख्य पर्याय उपलब्ध असल्याने, त्याच्या /तिच्या आवडीचे कपडे घालण्यास अनेक पर्याय उपलब्ध होतात.

२. इतर फॅब्रिकच्या तूलनेत मजबूत असल्याने ते सहज फाटत नाही. आणि जास्त काळ टिकतात. हॅंगआउट करताना बंधिस्त वागू शकता.

३. विविध प्रकारच्या स्टाईलमध्ये, हव्या त्या प्रकारामध्ये मिळतात.

४. कोणत्याही स्टाईलमध्ये, विशेष लूकसाठी एकाच वेळी अनेक कपडे घालू शकता.

५. स्टाईल करण्यासाठी सहज आणि सोपी पद्धत वापरता येते.

६. ‘स्मार्ट-कॅज्युअल ड्रेसिंग’ करिता स्पायकर डेनिमच्या कपड्यांचा वापर सर्वोत्तम आहे.

७. डेनिमवरील पडलेला डाग सहजरित्या दिसत नाही. जरी डिनर करताना कपड्यांवर डाग पडले तरी काळजी करण्याचे कारण नाही.

८. स्पायकर ची साईड स्ट्राईप्ड जीन्स किंवा ट्राऊजर तुमच्या वरच्या कपड्यांना उत्तम स्पोर्टी लुक देते.

९. यावर सुरकुत्या सहज पडत नाहीत आणि पडलेल्या सहज दिसत नाहीत.

१०. स्ट्रेचेबल असल्याने आरामदायी वाटते, त्यामुळे समोरच्या व्यक्तीसमोर आपला कॉन्फिडन्स कायम राहतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why you should wear denim on the date
First published on: 28-02-2019 at 18:03 IST