मंजिरी कापडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळा सुरु झाला की हवेतील गारठा वाढू लागतो. त्यासोबतच कोणताही पदार्थ खाल्ला की त्याचं पचन लवकर होत नाही. म्हणूनच या दिवसांमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. साधारणपणे हिवाळ्यात डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू असे पदार्थ खाल्ले जातात. त्यासोबतच काही ठिकाणी बाजरीदेखील खाल्ली जाते. आता बाजरी म्हटलं की साधारणपणे बाजरीच्या भाकऱ्याच सगळ्यांच्या डोळ्यापुढे येतील. मात्र, भाकरी व्यतिरिक्त बाजरीपासून इतरही पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे बाजरीचे वडे कसे करायचे ते जाणून घेऊयात.

साहित्य –
१.बाजरीचे पीठ -दोन वाटय़ा
२. भिजवलेली उडीद डाळ -अर्धी वाटी
३. जिरे -दोन लहान चमचे
४. हिरव्या मिरच्या -पाच ते सहा
५. लसूण पाकळ्या -सात ते आठ पाकळ्या
६. चिरलेली कोथिंबीर -अर्धी वाटी
७. हिंग व हळद – २ चमचे
८. ओवा,मीठ, तेल – गरजेनुसार

कृती –
सर्वप्रथम उडीद डाळ वाटून घ्या. जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या वाटून घ्या. बाजरीच्या पिठात हे सर्व घाला. हिंग, हळद, ओवा, कढीपत्ता घाला. गरम तेलाचे मोहन चार टी स्पून घाला. पीठ मळून घ्या. नंतर या मिश्रणाचे पुरीच्या आकाराचे वडे थापून तेलात तळून घ्या. वरून तीळ लावल्यास छान दिसतील. हे वडे दही किंवा कुठल्याही चटणी बरोबर सव्‍‌र्ह करा.
– लोकप्रभा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter special recipes bajariche wade ssj
First published on: 02-12-2020 at 16:45 IST