आजच्या काळात वाढलेलं वजन ही अनेक महिलांसाठी सर्वात मोठी समस्या ठरत आहे. अनेकदा लोक वर्कआउट तर करतात, पण आवडत्या पदार्थ खाणे टाळू शकत नाही आणि त्यामुळे शरीरात चरबी साचते. पण तुम्हाला माहीत आहे का? वजन कमी करण्यासाठी नेहमी भुकेल्या उपाशी राहण्याची आवश्यकता नाही. योग्य स्ट्रॅटेजी ठेवल्यास तुम्ही खाऊन-पिऊन देखील वजन कमी करू शकता.
फिटनेस कोच अमाका यांनी इंस्टाग्रामवर आपली फिटनेस प्रवासाबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या पेज Shred With Amaka वर १० खास टिप्स सांगितल्या, ज्यामुळे त्यांनी तब्बल २५ किलो वजन कमी केलं.
अमाका सांगतात की, या १० सोप्या सवयी जर रोजच्या जीवनशैलीत आत्मसात केल्या तर कोणालाही वजन कमी करणं शक्य आहे आणि त्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही.
वजन कमी करण्यासाठी अमाका यांनी सांगितलेल्या १० खास टिप्स
- तुम्ही जेवताना पोट भरून खाऊ शकता, पण लक्षात ठेवा की दिवसभरात तुम्ही जितक्या कॅलरीज खर्च करता, त्यापेक्षा कमी कॅलरीज घ्यायला हव्यात. स्वत:ला उपाशी ठेवण्याची गरज नाही. छोटी प्लेटमध्ये अन्न खा म्हणजे जास्त अन्न खाल्ले जाणार नाही
- तुमच्या जेवणात असे पदार्थ असावेत जे फायबरने आणि प्रोटीनने समृद्ध आहेत. फायबर आणि प्रोटीनमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते. त्यामुळे क्रेविंगवर कंट्रोल राहतो.
- दररोज चालण्याची सवय लावा. रोज ८ ते १० हजार पावलं चालल्याने फॅट लवकर कमी होतं आणि वजन नियंत्रित राहतं.
- साखर आहे खरा शत्रू. कोल्डड्रिंक्स, पेस्ट्री, पॅकेज्ड ज्यूस यामुळे फॅट पटकन वाढतं. त्यामुळे साखरेचं सेवन कमी करा.
- स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. वजन उचलण्याचे व्यायाम केल्याने कार्डियोपेक्षा जास्त परिणामकारकपणे फॅट बर्न होतं. शरीर विश्रांतीत असतानाही कॅलरी बर्न होते.
- पुरेशी झोप घ्या. खराब झोपेमुळे स्ट्रेस वाढतो, भूक वाढते आणि मेटाबॉलिझम स्लो होतो. त्यामुळे वजन कमी करणं अवघड होतं.
- जेवताना पाणी पिऊ नका. जेवणाआधी किंवा जेवणानंतर थोड्या वेळाने पाणी प्या. त्यामुळे अन्न नीट पचते.
- परफेक्शनच्या मागे लागू नका. हळूहळू सातत्याने प्रयत्न करत राहा. हेच तुम्हाला फिट ठेवेल.
- फक्त वजनकाट्यावर अवलंबून राहू नका. वजनकाटा कधी कधी चुकीचं दाखवतो. प्रगती फोटो, कपड्यांची फिटिंग आणि शरीराच्या मापांवर लक्ष द्या.
- सहनशीलता ठेवा. वजन कमी होण्यासाठी वेळ लागतो. रोजच छोट ध्येय ठरवा आणि किमान ८०% पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शेवटी मोठा बदल दिसून येईल.