महिलांसाठी एक चांगली बातमी! ताजा भाजीपाला, फळे, मासे यांचा आहारात नियमित समावेश असेल, तर महिलांची हाडे बळकट होतात. एखादा लहानसा अपघात झाल्यास अस्थिभंग (फ्रॅक्चर) होण्याचा धोका टळतो. अमेरिकी संशोधकांनी यावर सखोल संशोधन करून हा निष्कर्ष काढला आहे.
भाजीपाला, फळे, मासे यांच्यात दाहकताविरोधी घटक असतात. यांचे आहारात नियमित प्रमाण असेल, तर हाडांची खनिज घनता वाढते.
हाडांच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे घटक असतात, असे अमेरिकेतील ओहायो विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले. महिला दाहकविरोधी आहार कमी करतात, असे निरीक्षण हे संशोधक नोंदवतात. त्यामुळे त्यांची हाडे ठिसूळ होतात आणि एखादा अपघात घडल्यास अस्थिभंग होतो, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. जर किमान सहा वर्षांच्या कालावधीत महिलांनी नियमित ताजा भाजीपाला, ताजी फळे, मासे यांचा नियमित समावेश आहारात केल्यास त्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोर जावे लागणार नाही, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकेतील ६३ वर्षांखालील अनेक गौरवर्णीय महिला अस्थिभंगाला सामोरे गेल्या आहेत, असेही या संशोधकांनी सांगितले.