पौष्टीक आहाराबद्दलची माहिती असण्यात पुरुषांपेक्षा महिलाच वरचढ असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पौष्टीक आहाराचे ज्ञान आणि त्यानुसार खाद्यपदार्थांच्या खरेदीचा अंदाज बांधणे यामध्ये महिलाच पुरषांपेक्षा हुशार असल्याचे हा अहवाल सांगतो.
कॅनडा युनिर्व्हसिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांचा पौष्टीक खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयी ते राहत असलेल्या परिसराच्या आसपास उपलब्ध असलेल्या स्रोतांपर्यंतच मर्यादित असतात परंतु, महिलांच्या बाबतीत तसे आढळून येत नाही. केवळ आपल्या जवळ दुकान असल्यामुळे तेथूनच पदार्थ खरेदी करण्याऐवजी पदार्थांच्या पौष्टीकेतवर पुरुषांपेक्षा महिला जास्त भर देतात असे आढळून आले आहे. पौष्टीकतेचे ज्ञान असल्याच्या बाबतीत यावर कॅनडा युनिर्व्हसिटीत सखोल अभ्यास करण्यात आला. टोरान्टोमधील तब्बल ४९,४०३ जणांचे कॅनडीयन कम्युनिटी हेल्थ सर्व्हे(सीसीएचएस) मार्फेत पौष्टीक आहाराबद्दलचे ज्ञान जाणून घेण्यात आले. यातूनच महिलांना पुरूषांपेक्षा पौष्टीकतेचे अधिक ज्ञान असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामध्ये सर्वेक्षणातील शहरातील महत्त्वाचे सुपर मार्केट्स, किराणा बाजार, फळे आणि भाज्यांच्या दुकानांचा समावेश करण्यात आला होता. या दुकांनावर महिला आणि पुरुषांनी दिलेल्या खाद्यपदार्थांच्या पसंतीचा अभ्यास करण्यात आला होता. पौष्टीक पदार्थांना पुरुषांपेक्षा महिलांनीच जास्त पसंती दिल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.