आजच्या व्यस्त जिवनामध्ये आपली लाइफ स्टाइटच मधुमेह होण्याचे कारण ठरत आहे. तर काही जणांना अनुवांशिकतेमुळे मधुमेहाला समारं जावं लागतेय. पण सुरूवातीपासूनच काळजी घेतली तर मधुमेहाच्या धोक्यापासून वाचता येऊ शकते. दररोजच्या आहारात असणाऱ्या जंक फूडच्या समावेशामुळे अनेकजण मधुमेहाला आमंत्रण देत आहेत. जंक फूडच्या सेवनाने मधुमेह या आजाराची समस्या जादा निर्माण होण्यास मदत हाते. कारण या पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. जेव्हा तुम्ही आहार घेत असता त्यातून शरीराला योग्य प्रमाणात ग़्लुकोज शरिरास मिळत असतो. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण योग्यरित्या राखले जाते. जंकफूड मुळे चयपचनाची प्रक्रिया बिघाड होऊन शरीरातील इन्सुलिनचे कार्य बिघडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोप्या आणि घरगुती उपायामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. आपल्या रोजच्या आहारामध्ये पुढील बाबींचा समावेश केल्यास मधुमेहावर नियंत्रण तरणे सोपं जाऊ शकते. जाणून घेऊयात खाण्यामध्ये काय असावे….

तुळशी –
आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. तुळशीच्या पानांमध्ये मधुमेहासाठी आवश्यक असणारे अँटिऑक्सिडेंट आणि तेल असते. त्यामुळे शरीरात युजेनॉल, मेथल युजेनॉल आणि कॅरियाफोलिनच्या वाढीस मदत होते. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. दररोज सकाळी तुळशीचे पाने अथवा त्याचा काढा पिल्यास मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो. तुळशीच्या पानाच्या सेवनामुळे आपल्या शरिरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.

दालचीनी –
दालचिनीमुळे इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढून रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. दररोज अर्धा टिस्पून दालचिनीची पावडर खाल्याने इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढून वजन नियंत्रित राहते. हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे.

ग्रीन कॉफी किंवा ग्रीन टी –
ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी अनफरमेंटेड असून त्यात पॉलिफिनॉल हा घटक मुबलक असतो. पॉलिफिनॉलमधील अँटिऑक्सिडंट आणि हायपोग्लेसिमिक गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ग्रीन टी पिण्याने तुम्हाला फायदा होईल.

जांभूळ –
जांभळामध्ये ग्लायकोसाइड हा घटक असल्यामुळे जांभळाच्या बिया स्टार्चचे साखरेत रुपांतर होऊ देत नाहीत. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहून इन्सुलिनचे संरक्षण होते. जांभळामधील काही घटकांमुळे हृदयविकार व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या विकारापासून बचाव होतो.

कारले –
कारले मधुमेहींसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. कारण त्यामधील कॅराटिन आणि मोमोर्डिसीन हे घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World diabetes day 2018 to control diabetes lets do these five home remedies
First published on: 14-11-2018 at 13:51 IST