एक लोकप्रिय म्हण आहे की जी सर्वांनी अनेकदा ऐकली आहे ती म्हणजे ‘एक फोटो हजार शब्दांप्रमाणे असते’ ही म्हण जागतिक फोटोग्राफी दिनामागील मूळ कल्पना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकते. हा दिवस दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. फोटोग्राफी उत्साही जगभरातून एकत्र येऊन फोटो काढण्याची कला साजरा करतात. फोटोग्राफीच्या विज्ञानाने संपूर्ण मानवी इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. आज आपल्याकडे ऐतिहासिक क्षणांच्या नोंदी आहेत कारण ते छायाचित्रांमध्ये टिपले गेले आहेत आणि ते कायमचे पाहिले जाऊ शकतात. फोटोग्राफी अभिव्यक्ती, भावना, कल्पना आणि क्षण ताबडतोब कॅप्चर करू शकते आणि भावी पिढ्यांसाठी साठवून ठेवता येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक फोटोग्राफी दिनाचा इतिहास

जागतिक छायाचित्रण दिनाचे मूळ शोधले तर फ्रान्समध्ये १८३७ पर्यंत जाऊ शकते. जोसेफ नीसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे नावाच्या दोन फ्रेंच लोकांनी ‘डॅगुएरोटाइप’ चा शोध लावून प्रथमच छायाचित्रण प्रक्रिया विकसित केली. फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सने १९ जानेवारी १८३७ रोजी अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. असे मानले जाते की घोषणा झाल्यानंतर १० दिवसांनी, फ्रेंच सरकारने आविष्काराचे पेटंट खरेदी केले आणि ते जगाला भेट म्हणून दिले कॉपीराइट न ठेवता दिले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World photography day 2021 history of photography camera and why august 19 ttg
First published on: 18-08-2021 at 18:21 IST