World Pulses Day: दरवर्षी १० फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो. (World Pulses Day 2024) कडधान्यांमधील पोषक घटक आणि त्याच्या फायद्यांसंदर्भात लोकांना जागरुक करण्याच्या उद्देशाने हा साजर केला जातो. दरम्यान, २०१६ मध्ये पहिल्यांदाच जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १० फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून दरवर्षी १० फेब्रुवारीला कडधान्य दिन साजरा केला जातो.

कडधान्य म्हणजे काय आणि त्याचे फायदे कोणते? (Pulses Benefits) 

जी धान्यं द्विटल असतात म्हणजे बियांमध्ये दोन भाग असतात, ज्यापासून डाळी तयार होतात त्यांना कडधान्य म्हणतात. मूग, मटकी, मसूर, उडीद, तूर, हरभरा, राजमा, वाटाणा, कुळिथ यांसारख्या अनेक प्रकारच्या कडधान्यांचा यात समावेश होतो. या कडधान्यांना प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आहारात विविध प्रकारच्या कडधान्यांचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते. विशेष म्हणजे शिजवल्यानंतरही या कडधान्यांमधील पौष्टिक घटक सुरक्षित राहतात.

दररोज आपले शरीर थोडे थोडे प्रथिने वापरत असते. अशावेळी शरीरात प्रथिनांची कमतरता भासू नये यासाठी प्रथिनेयुक्त पदार्थ अर्थात कडधान्य खाणे फायदेशीर ठरू शकते.

उडदाची डाळ : डाळ ही प्रथिनेयुक्त आहार मानली जाते. विशेषतः उडदाच्या काळ्या डाळीमध्ये भरपूर प्रथिने, फायबर असते. १०० ग्रॅम उडीद डाळीमध्ये सुमारे २५ टक्के प्रोटीन असते. याच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात आणि तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

चण्याची डाळ : चण्याची डाळ प्रथिनांसह फायबर, जस्त, कॅल्शियम आणि फोलेट समृद्ध मानली जाते. १०० ग्रॅम चण्याच्या डाळीमध्ये सुमारे १३ टक्के प्रथिने आढळतात. या डाळीचा आहारात विविध प्रकारे वापर केला जातो. लोक चणे स्प्राउट्स म्हणून खातात, तसेच याचे बेसन पीठ म्हणून वापर केला जातो. यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ते खूप फायदेशीर ठरते. या डाळीमध्ये असलेले अमिनो अॅसिड पेशींना मजबूत करते.

तूर डाळ : तूर डाळ ही खायला खूप चविष्ट लागते. शिजवलेल्या १०० ग्रॅम तूर डाळीमध्ये सुमारे ५.९२ ग्रॅम प्रथिने आढळतात. यासोबत कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, साखर, फायबर यांसारखे पोषक घटकही यामध्ये आढळतात. या डाळीच्या सेवनामुळे पोट बराच काळ भरलेले राहते, जे वजन कमी करण्यासाठी चांगले ठरते.

मूग डाळ : मूग डाळ ही देखील अतिशय फायदेशीर आणि पचण्याजोगी मानली जाते. ही पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. बहुतेक तज्ज्ञ आजारपणात मुगाच्या डाळीची खिचडी किंवा त्यापासून बनवले जाणारे हलके पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. कारण यातील पोषक घटक आजारी व्यक्तीला बरे होण्यासाठी मदत करतात. १०० ग्रॅम मूग डाळीमध्ये ९ ग्रॅम प्रोटीन आढळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मसूर डाळ : मसूर डाळ ही सालीसकट किंवा सालीविना खाल्ली जाते. लोक ही डाळही चवीने खातात. १०० ग्रॅम मसूरमध्ये सुमारे ९ टक्के प्रथिने आढळतात. लोकांना ही डाळ मखनीच्या स्वरूपात खायला आवडते.