शाओमी कंपनीने भारतात आपला नवा Poco F1 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. शाओमीच्या सब ब्रँड पोकोचा हा पहिलाच फोन आहे. या फोनद्वारे वनप्लस 6 ला टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. तीन व्हेरिअंट्समध्ये Poco F1 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे इंफ्रारेड फेस अनलॉक फीचर. या फीचरच्या मदतीने तुम्ही अंधारात असो, किंवा उजेडात, चेहऱ्याच्या मदतीने फोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

या फोनमध्ये दमदार प्रोसेसर देण्यात आलं आहे. क्वालकॉम फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरमुळे जर अतिवापरामुळे फोन गरम झाल्यास आपोआप कूलिंग होईल. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम / 64 जीबी इंटरनल स्टोरेज, 6 जीबी रॅम / 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट रोजी फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर(mi.com) याचा पहिला सेल आयोजीत केला जाणार आहे. यामध्ये अनेक ऑफर्संही देण्यात आल्या असून एचडीएफसी कार्डने फोन खरेदी केल्यास एक हजार रुपयांची सूट मिळेल. तर, पहिल्या सेलमध्ये रिलायन्स जिओ यूजर्सना आठ हजार रुपये कॅशबॅक आणि सहा टेरा बाईटपर्यंत हायस्पीड डेटा मिळेल.

6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 20 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 23 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

या फोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तर पुढील बाजूला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 4000mah ची बॅटरी फोनमध्ये देण्यात आली असून अॅन्ड्रॉइड 8.1 ओरियो आधारित मीयुआय 9.6 प्रणालीवर हा फोन कार्यरत राहिल. फोनचा मागील भाग पॉलीकार्बोनेट ब्लॅक रंगाचा आहे. रोस्सो रेड , स्टील ब्ल्यू आणि ग्रॅफाइट ब्लॅक या तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल.