अनेक लोक शनिला वाईट परिणाम देणारा ग्रह मानतात, पण तसे नाही. ज्योतिष शास्त्रानुसार शनि सुद्धा शुभ फल देतो. कुंडलीत शनीची स्थिती बलवान असेल तर अशा व्यक्ती जीवनात खूप प्रगती करतात. तसेच त्यांचे सर्वत्र त्याचे नाव असते. तर दुसरीकडे शनि कमकुवत स्थितीत बसला असेल तर आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. २०२२ मध्ये शनी कोणत्या राशीच्या लोकांवर कृपा करेल, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात.

मेष : या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण शुभ राहील. करिअरमध्ये प्रगती होईल. या वर्षी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. हा कालावधी विशेषत: प्रशासकीय नोकऱ्या, लॉ फर्म आणि इंधन उद्योगात असलेल्यांसाठी फायदेशीर ठरेल. पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हे वर्ष अनुकूल दिसत आहे. उच्च अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुम्हाला सर्वत्र सन्मान मिळेल.

वृषभ : या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष शुभ राहील. २९ एप्रिल २०२२ रोजी शनीच्या राशी बदलामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. व्यावसायिक जीवनात काही चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला हवी ती नोकरी मिळू शकते. या कालावधीत प्रलंबित कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

नामकरण विधी: बाळाचं नाव ठेवताना या चुका करू नका; जाणून घ्या ज्योतिषशास्त्राचे नियम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु : या राशीच्या लोकांसाठी २०२२ मध्ये शनि ग्रहाची स्थिती शुभ राहील. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेत गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. विवाहितांसाठीही हे वर्ष अनुकूल राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. या वर्षी लाभाच्या अनेक संधी मिळतील. एप्रिल महिन्यात शनि तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला अचानक लाभ किंवा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.