सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे विविध वयोगटातील लोकांमध्ये कंबरदुखीची समस्या उद्भवलेली दिसून येते. पारंपरिक योगशास्त्रात या समस्येवर उपयुक्त असे आसन देण्यात आले आहे. भूनमनासन असे या आसनाचे नाव असून ते नियमित केल्यास कंबरदुखीपासून सुटका होऊ शकते. हे तोलात्मक आसन असून डोके जमिनीवर टेकवून करायचे असते. दंड स्थितीत उभे राहून दोन्ही पायांमध्ये योग्य ते अंतर घ्यावे. मग डावा पाय जास्तीत जास्त लांब करावा. गुडघ्यात वाकू देऊ नये. यानंतर कंबरेत वाकून डोके डाव्या पायाच्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करावा. हळूहळू डोके डाव्या पावलाजवळ न्यावे आणि जमिनीवर टेकवावे. हे आसन आलटून पालटून दोन्ही पायाने करावे.

आसन करताना दोन्ही हात कंबरेभोवती लपेटावेत. सुरुवातीला आपल्याला जमत नाही असे वाटत असेल तर दोन्ही हातांपैकी एक हात कंबरेभोवती लपेटून दुसऱ्या हाताचा आधार घेता येतो. मात्र कोणतेही आसन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. हे आसन करताना आपण ज्या पायाजवळच्या जमिनीवर आपण डोके टेकवणार आहोत तिथे मऊ कापडाची जाडसर घडी ठेवावी त्यामुळे डोक्याला खडबडीत लागत नाही. श्वास सोडत डोके जमिनीला टेकवावे.

diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?

या आसनाचे अनेक फायदे आहेत. पिट्युटरी ग्रंथींवर दाब यतो व त्यामुळे मेंदूचे कार्य प्रगल्भ होते. शिर्षासनाचे सर्व फायदे या आसनामध्ये मिळतात. हातापायाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. मात्र ज्यांना फिटस येत असतील किंवा डोक्याची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करु नये. गरोदर स्त्रियांनी तसेच मासिक पाळी सुरु असताना हे आसन करुनये. काहीवेळा हे आसन करताना तोंडावर पडण्याची शक्यता असल्याने तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय हे आसन करु नये. सुरुवातीला १० सेकंदांपर्यंत आणि नंतर २० सेंकंदांपर्यंत टिकवता येतो. या आसनामुळे नाभीवर ताण येतो आणि त्यामुळे पाचकग्रंथी चांगल्या स्त्रवतात. अनानाचे पचन चांगले होण्यास मदत होते. सुरुवातीला डोके जमिनीला लावता आले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. सरावाने पावलापर्यंत खाली डोके कंबरेत योग्यप्रकारे वाकले जाते. यामुळे कंबरेतील स्नायूंना व्यायाम मिळतो. मात्र हे आसन करताना गुडघे ताठ ठेवावेत. कंबरदुखी बरी व्हायला यामुळे मदत होते.

सुजाता गानू-टिकेकर