सध्याच्या तरुण पिढीतील वयस्कांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी झालेल्या अपघातांमुळे हाड मोडण्याचे आणि योगाशी संबंधित दुखापतींचे प्रमाण हे तीन पटीने जास्त असल्याचा दावा नव्या संशोधनातून केला गेला आहे.

हा दावा २००१ ते २०१४ मधील अमेरिकेच्या नॅशनल इलेक्ट्रॉनिक इंज्युरी सव्‍‌र्हिलेन्स सिस्टमने संकलित केलेल्या माहितीवरून अमेरिकेतील बर्मिगहम येथील अलाबामा विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. या वेळी संशोधकांना २०१४ मध्ये एक लाख सहभागी लोकांमध्ये योगाशी संबंधित विविध प्रकारच्या दुखापतींचे प्रमाण हे १७ टक्क्य़ांनी वाढल्याचे, तर २००१ मध्ये हेच प्रमाण १ लाखांमागे १० असे असल्याचे आढळून आले. तर ४५ ते ६४ वयोगटातील १ लाख सदस्यांपैकी हे प्रमाण १८ टक्के आहे, तर त्याच प्रकारे १८ ते ४४ वयोगटातील लोकांमध्ये हे प्रमाण केवळ १२ टक्के आहे.

या वेळी संशोधकांनी केलेल्या अभ्यासादरम्यान २९ हजार ५९० लोकांमध्ये योगाशी संबंधित दुखापती आढळून आल्या. त्यातील अध्र्याहून अधिक दुखापती म्हणजे जवळपास ४५ टक्के दुखापती या लचक यांसारख्या पद्धतीच्या असल्याचे आढळून आले. हे संशोधन ‘आथरेपेडिक जनरल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)