आजपासून(दि.15) देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. ‘ट्राय’च्या (Telecom Regulatory Authority of India – TRAI) आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य (0) डायल करावा लागेल. ‘ट्राय’चा हा नवा आदेश आजपासून लागू होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रायने 29 मे 2020 रोजी याबाबत दूरसंचार विभागाला शिफारस केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी 20 नोव्हेंबर रोजी दूरसंचार विभागाने ट्रायची शिफारस स्वीकारताना टेलिकॉम कंपन्यांना आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले होते. दूरसंचार कंपन्यांना ही नवीन व्यवस्था स्वीकारण्याबाबतचं परिपत्रक विभागाकडून जारी करण्यात आलं होतं. या नवीन बदलामुळे दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. डायल करण्याची पद्धत बदलल्यावर दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल सेवेसाठी 254.4 कोटी अतिरिक्त नंबर निर्माण करता येतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will not be able to call a mobile number from today without prefixing 0 check details sas
First published on: 15-01-2021 at 08:29 IST